
PM Ujjwala Yojana : सिलिंडर भरून घेण्याकडे लाभार्थ्यांची पाठ; जाणून घ्या कारण....
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या PM Ujjwala Yojana अंतर्गत महिलांना मोफत गॅस सिलिंडर दिला जातो. याचा लाभ लाखो महिला आणि त्यांच्या कुटुंबियांना झाला असल्याचे सांगितले जाते; मात्र माहितीच्या अधिकारातून नुकत्याच हाती आलेल्या आकडेवारीनुसार या योजनेतील अनेक महिलांनी पुन्हा सिलिंडर भरलेला नाही.
माहिती अधिकार कार्यकर्ते चंद्रशेखर गौड यांनी इंडियन ऑयल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL), हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (HPCL) आणि भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (BPCL) यांच्याकडून माहिती मागवली होती. यातून समोर आलेल्या माहितीनुसार २०२२-२३ या वर्षात ९० लाख लाभार्त्यांपैकी एकानेही सिलिंडर भरला नाही. १ कोटींहून अधिक लाभार्थ्यांनी वर्षभरात केवळ एकदाच सिलिंडर भरला.
या योजनेची सुरुवात १ मे २०१६ या दिवशी उत्तर प्रदेशातून झाली होती. मार्च २०२० पर्यंत या योजनेंतर्गत ८ कोटी नागरिकांना गॅस जोडणी देण्याचे लक्ष्य निश्चित करण्यात आले होते. या योजनेचा दुसरा टप्पाही सुरू झाला आहे. आतापर्यंत ९ कोटी नागरिकांनी गॅस जोडणी देण्यात आली आहे. आणखी १ कोटी नागरिकांना यात सहभागी करून घेण्याचा निर्णय घेण्यात आला आ
वर्षभरात एकही सिलिंडर न भरणाऱ्या लाभार्थ्यांमध्ये बीपीसीएलचे २८.५६ लाख, आयओसीएलचे ५२ लाख, एचपीसीएलचे २७.५८ लाख लभार्थी आहेत. अलीकडेच सिलिंडरची किंमत ५० रुपयांनी वाढली. यामुळे एलपीजी सिलिंडरची किंमत १ हजार रुपयांपर्यंत पोहोचली. सिलिंडर महाग असल्याने उज्ज्वला योजनेतील लाभार्थ्यांनी सिलिंडर भरून घेणे बंद केले आहे. त्यांनी पुन्हा चुलीचा वापर सुरू केला आहे.
करोनाकाळात सरकारने या योजनेतील लाभार्थ्यांना ३ सिलिंडर मोफत देऊ केले होते. याअंतर्गत १४.१७ कोटी सिलिंडर भरण्यात आले.