esakal | मोदी अयोध्येत सर्वात आधी करणार हनुमानाची पूजा; जाणून घ्या कारण
sakal

बोलून बातमी शोधा

PM_Narendra_Modi7.jpg

पंतप्रधान नरेंद्र मोदी 5 ऑगस्ट रोजी राम मंदिराच्या भूमिपूजनाच्या सोहळ्यासाठी अयोध्येत जाणार आहेत. नरेंद्र मोदी या धार्मिक सोहळ्याची सुरुवात हनुमान गढी मंदिरातील पूजेने करणार आहेत

मोदी अयोध्येत सर्वात आधी करणार हनुमानाची पूजा; जाणून घ्या कारण

sakal_logo
By
वृत्तसंस्था

नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी 5 ऑगस्ट रोजी राम मंदिराच्या भूमिपूजनाच्या सोहळ्यासाठी अयोध्येत जाणार आहेत. नरेंद्र मोदी या धार्मिक सोहळ्याची सुरुवात हनुमान गढी मंदिरातील पूजेने करणार आहेत. हनुमानाशिवाय भगवान रामाचे कोणतेही काम सुरु होत नाही, त्यामुळे मोदी अगोदर हनुमानगढी मंदिरात जावून हनुमानाची पूजा करणार आहेत. पंतप्रधान मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री हनुमानगढी येथे विशेष पूजा करणार आहेत. मोदी अगोदर हनुमानगढीला भेट देतील, त्यानंतरच ते राम जन्मभूमी येथे भूमिपूजनासाठी जातील. 

राम मंदिराच्या अशुभ मुहूर्तामुळे अमित शहांना कोरोना; काँग्रेस नेत्याची मोदींना...

हनुमानगढी मंदिराचे पुजारी माधवन दास यांनी एएनआयशी बोलताना प्रतिक्रिया दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ 5 ऑगस्ट रोजी अयोध्येला येणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी सुरुवातीला पूजेसाठी हनुमानगढीला येतील आणि त्यानंतर ते राम जन्मभूमी मंदिराचे भूमीपूजन करतील, अशी माहिती त्यांनी दिली आहे. भगवान हनुमानाशिवाय भगवान रामाचे कोणतेही काम सुरु केली जाऊ शकत नाही. त्यामुळे मोदी आणि योगी हनुमानगढी येथे विशेष पूजा करतील आणि त्यानंतर भूमिपूजनाच्या स्थळी जातील, असंही त्यांनी सांगितलं.

हनुमानाच्या आशीर्वादाशिवाय कोणतेही काम होऊ शकत नाही. त्यामुळे अगोदर भगवान हनुमानाचा आशीर्वाद घेण्यात येईल. त्यामुळे राम मंदिराचे निर्माण कार्य सुरळीत पार पाडेल, असं माधवन दास म्हणाले आहेत. 

अयोध्यानगरीवर ड्रोनची करडी नजर; कडेकोट सुरक्षा

राम मंदिराच्या भूमिपूजनाच्या पार्श्वभूमीवर अयोध्येत जय्यत तयारी करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी भूमिपूजनासाठी येणार असल्याने कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. कोरोना महामारी थैमान घालत असताना हा सोहळा आयोजित करण्यात आला आहे. त्यादृष्टीनेही अयोध्येत खबरदारी घेण्यात आली आहे. अयोध्येत बाहेरील लोकांना येण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. शिवाय या सोहळ्यासाठी काही विशिष्ठ व्यक्तींनाचा निमंत्रण देण्यात आले आहे. काही राजकीय नेते, धार्मिक क्षेत्रातील व्यक्ती आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. 

काही दिवसांपूर्वी मंदिराचे मुख्य पुजारी सत्येंद्र दास यांचे शिष्य प्रदीप दास यांना कोरोनाची लागण झाल्याच समोर आलं होतं. या पार्श्वभूमीवर सत्येंद्र दास यांना सोहळ्यास येण्यास बंदी घालण्यात आली आहे. शिवाय मंदिर परिसरात तैनात करण्यात आलेल्या काही पोलिस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं होतं. त्यामुळे राम मंदिर परिसरात विशेष काळजी घेतली जात आहे. 

(edited by-kartik pujari)