
नवी दिल्ली- POCSO म्हणजे प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्सेसवर कर्नाटक हायकोर्टाने महत्त्वाचे टिप्पणी केली आहे. एका २१ वर्षीय तरुणाने अल्पवयीन मुलीसोबत लग्न केल्याचे प्रकरण कोर्टात आले होते. याप्रकरणी कोर्टाने सुनावणी घेत गुन्हा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. (POCSO not meant to criminalize consensual relations between minors karnataka High Court )
पोक्सो म्हणजे दोन किशोरवयीन मुलांमधील संबंधाना गुन्हा ठरवणे असा त्याचा अर्थ नाही. पोक्सो अल्पवयीन मुलांना लैंगिक अत्याचारापासून वाचवण्यासाठी आहे. दोन किशोरवयीन मुलांनी परिणामांची कल्पना न करता एकमेकांच्या परवानगीने लैंगिक संबंध ठेवलेले आहेत, असं कोर्टने म्हटलं.
आरोपीच्या विरोधात IPC, POCSO अंतर्गंत गुन्हा दाखल करण्यात आला होता. कोर्टाच्या निर्णयामुळे हा गुन्हा रद्द करण्यात आला आहे. कोर्टाने म्हटलं की, आरोपी आणि अल्पवयीन मुलगी खालच्या सामाजिक-आर्थिक स्तरातून येतात. त्यांना आपल्या कृत्याच्या परिणामांची जाणीव नव्हती.
बार अँड बँचच्या रिपोर्टनुसार, बेंगळुरु पोलिसांनी याप्रकरणाची माहिती दिलीये. आरोपीला मुलगी अल्पवयीन असल्याची माहिती होती. तरी देखील त्याने तिच्याशी लग्न केले आणि तिच्याशी लैंगिक संबंध ठेवले. मुलीचे वय १६ वर्षे आहे. याप्रकरणी त्याच्याविरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर आरोपीने हायकोर्टात धाव घेत गुन्हा रद्द करण्याची मागणी केली होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.