POK Row: "...तर ते ही नसतं अन् हे ही"; पीओकेसाठी नेहरुंना जबाबदार धरणाऱ्या शहांना फारुख अब्दुल्लांचं उत्तर

अधिवेशनात आज जम्मू व काश्मीर आरक्षण संशोधन विधेयक अन् पुनर्रचना संशोधन विधेयकावर चर्चा झाली.
Pok issue
Pok issue

नवी दिल्ली : संसदेच्या हिवाळी अधिवेशनात जम्मू व काश्मीर आरक्षण संशोधन विधेयक आणि जम्मू व काश्मीर पुनर्रचना संशोधन विधेयकावर चर्चा पार पडली. यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी देशाचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरु यांना पीओकेसाठी जबाबदार धरलं.

तसेच त्यांची ही गंभीर चूक होती असंही भर सभागृहात सांगितलं. पण त्यांच्या या विधानाला जम्मू व काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे प्रमुख फारुख अब्दुल्ला यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. (POK Row Farooq Abdullah reply to Amit Shah who held Pandit Nehru responsible for Pakistan Occupied Kashmir)

Pok issue
Sharmistha Mukherjee: "तर राहुल गांधींचं ऑफिस PMO कसं सांभाळेल?"; प्रणव मुखर्जींच्या मुलीनं पुस्तकात सांगितला 'तो' किस्सा

अमित शहा काय म्हणाले होते?

सभागृहात चर्चेदरम्यान अमित शाहांनी काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला. ते म्हणाले, पाकव्याप्त काश्मीरचा (PoK) प्रश्न पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरु यांच्यामुळे निर्माण झाला. पूर्ण काश्मीर हातात येण्याआधीच शस्त्रसंधीचा निर्णय घेतला. (Latest Marathi News)

नाहीतर आज पीओके हा भारताचा भाग असता. नेहरुंच्या चुकीमुळं पाकिस्तानच्या ताब्यातील काश्मीर अर्थात पीओके निर्माण झाला.

Pok issue
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा कायदेमंत्रीपदाचा राजीनामा गहाळ; कोणत्याच यंत्रणेकडे मूळ प्रत नाही उपलब्ध!

फारुख अब्दुलांचं उत्तर काय?

शहांच्या नेहरुंवरील या टीकेला उत्तर देताना फारुख अब्दुल्ला म्हणाले, "त्यावेळी भारतीय लष्कराला आत्ताच्या पीओकेतून पुंच आणि राजौरी भागाला वाचवण्यासाठी वळवण्यात आलं होतं. (Marathi Tajya Batmya)

जर हे असं झालं नसतं तर पुंच आणि राजौरी हे भागही पाकिस्तानात गेले असते. याशिवाय दुसरा कोणताही पर्याय नव्हता. त्यामुळं यावर तोडग्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघात जायला हवं असं सरदार वल्लभभाई पटेल आणि लॉर्ड माऊंटबॅटन यांनी दोघांनीही सुचवलं होतं"

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com