बंगळूर : पंतप्रधान मोदींविरुद्ध अपमानजनक पोस्ट शेअर केल्याबद्दल मंड्या येथील एकाला अटक केली आहे. सोशल मीडियावर पंतप्रधान नरेंद्र मोदींविरुद्ध (PM Narendra Modi) अपमानजनक पोस्ट शेअर केल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी मंड्या जिल्ह्यातील मळवळ्ळी तालुक्यातील किरुगवालू गावातील जाविद नावाच्या व्यक्तीला अटक केली आहे.