3 जहाल नक्षलींना पोलिसांनी केली अटक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

police

3 जहाल नक्षलींना पोलिसांनी केली अटक

गडचिरोली: जिल्ह्यातील भामरागड अंतर्गत लाहेरी पोलिस मदत केंद्राच्या हद्दीतील कोयार जंगल परीसरात रविवार (ता. २८) पोलिसांनी तीन जहाल नक्षलवाद्यांना अटक केली. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे विशेष अभियान पथक (सी-60) व सीआरपीएफ बटालियन 37 चे जवान संयुक्त नक्षलविरोधी अभियान राबवित असताना 2 जहाल नक्षलवाद्यांना, अटक तसेच उपविभाग हेडरी अंतर्गत पोमके गट्टा हद्दीतील झारेवाडा जंगल परीसरात विशेष, अभियान पथकाचे जवान नक्षलविरोधी अभियान राबवित असतांना 1 जहाल नक्षलवाद्यास अटक करण्यात गडचिरोली पोलीस दलाच्या जवानांना यश प्राप्त झाले आहे.

नक्षलवाद्यांना दोन वेगवेगळया घटनांमध्ये अटक करण्यात आली असुन कोयार जंगल परीसरामध्ये अटक करण्यात आलेल्या जहाल नक्षलवाद्यांमध्ये रमेश पल्लो ( वय-29) रा. कोयार ता. भामरागड, तानी ऊर्फ शशी चमरु पुंगाटी ( वय 23) रा. पद्दुर ता. भामरागड जि. गडचिरोली यांचा समावेश आहे. झारेवाडा जंगल परीसरामध्ये अटक केलेल्या नक्षलवाद्याचे नाव अर्जुन ऊर्फ महेश रैनु नरोटे (वय 27) रा. झारेवाडा ता. एटापल्ली, असेआहे.

अटक सदस्यांबाबत माहीती

नामे-रमेश पल्लो

दलममधील कार्यकाळ

1) सन 2019 मध्ये भरती होवुन कंपनी 10 चा अॅक्शन टिम मेंबर व स्कॉऊट टिम मेंबर म्हणुन कार्यरत होता.

2) सद्या सन 2021-22 मध्ये तो स्कॉऊट टिम मेंबर म्हणुन कार्यरत होता.

कार्यकाळात केलेले गुन्हे

1) त्याचा 03 खुन, 08 चकमक, 01 जाळपोळ, 01 इतर अशा एकुण 13 गुन्ह्रामध्ये समावेश आहे.

नामे-तानी ऊर्फ शशी चमरु पुंगाटी

दलममधील कार्यकाळ

1) सन जुलै 2015 मध्ये ती नक्षलमध्ये भरती झाली.

2) सन 2016 ते 2019 पर्यंत ती प्लाटुन क्र 7 मध्ये सदस्य पदावर कार्यरत होती.

3) सन 2019 ते आतापर्यंत ती कंपनी क्र. 10 मध्ये सदस्य पदावर कार्यरत होती

कार्यकाळात केलेले गुन्हे

1) तिचा 04 ख्ुन व 03 चकमक अशा एकुण 07 गुन्ह्रामध्ये समावेश आहे

नामे अर्जुन ऊर्फ महेश रैनु नरोटे

दलममधील कार्यकाळ

1) सन 2010 साली पेरमिली दलम सदस्य पदावर भरती होवुन 2013 पर्यंत कार्यरत होता.

2) सन 2013 पासुन प्लॉटुन क्र. 14 मध्ये कार्यरत होता.

3) ऑगस्ट 2013 मध्ये सिरोंचा दलममध्ये बदली होवुन 2018 पर्यंत सदस्य पदावर कार्यरत होता.

4) मे 2018 पासुन ते आजपर्यत तो भामरागड दलममध्ये कार्यरत होता.

कार्यकाळात केलेले गुन्हे

1) त्याचा 7 खुन, 9 चकमक, 2 जाळपोळ, 2 दरोडा, 01 जबरी चोरी व इतर 03 अशा एकुण 24 गुन्हयामध्ये समावेश आहे.

महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेले बक्षीस

1) रमेश पल्लो याचेवर 4 लक्ष रूपये.

2) तानी ऊर्फ शशी चमरु पुंगाटी हीचेवर 4 लक्ष रूपये.

3) अर्जुन ऊर्फ महेश रैनु नरोटे याचेवर 02 लक्ष रूपये

आतापर्यंत 57 जण जेरबंद...

गडचिरोली पोलीस दलाने राबविलेल्या प्रभावी नक्षलविरोधी अभियानामुळे सन 2021-22 या दोन वर्षाच्या कालावधीत आतापर्यंत एकुण 57 जहाल नक्षलवाद्यांना अटक करण्यात गडचिरोली पोलीस दलास यश मिळाले आहे. सदरची कारवाई. पोलीस अधीक्षक. अंकित गोयल. यांचे मार्गदर्शनाखाली व अपर पोलीस अधीक्षक (अभियान) सोमय मुंडे,अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन). समीर शेख., अपर पोलीस अधीक्षक अहेरी अनुज तारे सा.यांचे नेतृत्वात पार पडली.

Web Title: Police Arrested Jahal Naxalites Crime Gadchiroli

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..