बेळगाव : बेळगाव शहर पोलिस आयुक्त याडा मार्टीन (Belgaum City Police Commissioner Yada Martin) यांची गुरुवारी अचानक बदली झाली आहे. त्यांच्या जागी भूषण गुलाबराव बोरसे यांची नवे पोलिस आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. यासंदर्भातील अधिकृत आदेश राज्य सरकारने गुरुवारी जारी केला. याडा मार्टीन यांना सध्या कोणतीही नवीन जबाबदारी किंवा पद देण्यात आलेले नाही. त्यामुळे त्यांच्या पुढील नियुक्तीबाबत सरकार पातळीवर निर्णय व्हायचा आहे.