गाझीयाबाद मारहाण प्रकरण: स्वरा भास्कर, ट्विटरच्या प्रमुखाविरोधात तक्रार

गाझीयाबाद मारहाण प्रकरण: स्वरा भास्कर, ट्विटरच्या प्रमुखाविरोधात तक्रार

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील गाझीयाबादमध्ये वयस्कर मुस्लिम व्यक्तीला मारहाण करुन त्याची दाढी कापण्याची घटना सध्या चर्चेत आहे. या संदर्भातच आता पोलिसांनी बॉलिवूड ऍक्ट्रेस स्वरा भास्करच्या विरोधात देखील तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीमध्ये स्वरा भास्कर शिवाय अरफा खानम शेरवानी, आसिफ खान, ट्विटर इंडिया आणि ट्विटर इंडियाचे प्रमुख मनीष महेश्वर यांचं देखील नाव सामील आहे.

गाझीयाबाद मारहाण प्रकरण: स्वरा भास्कर, ट्विटरच्या प्रमुखाविरोधात तक्रार
CBSE बारावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल कसा लावणार: फॉर्म्युला SC मध्ये सादर

काय आहे आरोप?

हे प्रकरण अधिक चिघळवण्यासाठी प्रक्षोभक ट्विट केल्याचा आरोप या लोकांवर करण्यात आला आहे. वकील अमित आचार्य यांनी सर्वांच्या विरोधात पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. मात्र, अद्याप FIR दाखल झाली नाहीये. पोलिसांचं म्हणणं आहे की, ते या प्रकरणाची चौकशी करत आहेत.

या प्रकरणी याआधी अनेक पत्रकार आणि नेत्यांवर देखील तक्रार दाखल झाली आहे. पोलिसांनी पत्रकार राणा आयुब, सबा नकवी, शमा मोहम्मद, मसकूर उस्मानी, काँग्रेस नेता सलमान निजामी सहित अनेक लोकांवर दिशाभूल करणाऱ्या पोस्ट केल्याच्या आरोप करण्यात आला आहे.

गाझीयाबाद मारहाण प्रकरण: स्वरा भास्कर, ट्विटरच्या प्रमुखाविरोधात तक्रार
अबब ! व्हेल माशाच्या उलटीची किंमत पावणे तीन कोटी रुपये

तक्रारीनुसार, या लोकांनी संपूर्ण माहिती घेतल्याशिवाय अनेक ट्विट्स केले आहेत, जे हजारो लोकांनी रिट्वीट केले आहेत. या प्रकरणी ट्विटर इंडिया देखील प्रश्नांच्या घेऱ्यात अडकले आहे. याआधी केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद या प्रकरणी केलेल्या ट्विटमध्ये म्हटलंय की, उत्तर प्रदेशमध्ये जे काही झालं, त्यामध्ये फेक न्यूजच्या विरोधातील लढ्यामध्ये ट्विटरचा मनमानी कारभार दिसून येतो.

गाझीयाबादमध्ये वयस्कर मुस्लिम व्यक्तीच्या मारहणप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत चार लोकांना अटक केली आहे. पीडित व्यक्तीने दावा केलाय की, त्यांना मारहाण करणाऱ्यांनी त्यांना जबरदस्ती 'जय श्रीराम'ची घोषणा द्यायला लावली होती. पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाला धार्मिक वळण असेल, या शंकेला नकार दिला आहे. पोलिसांचं म्हणणं आहे की, सूफी अब्दुल समद यांना मारहाण करणाऱ्यांमध्ये हिंदू-मुस्लिम असे मिळून साधारण सहा लोक सामील होते आणि ते सर्वजण त्यांच्याकडून विकल्या गेलेल्या ताबीजमुळे नाखूश होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com