जम्मू-काश्‍मीर पोलिसांनी पोलिसांनी हल्ल्याचा कट उधळला

जावेद मात्झी
शनिवार, 5 मे 2018

श्रीनगरजवळ तीन दहशतवादी ठार; मोठा शस्त्रसाठा जप्त

श्रीनगर : जम्मू-काश्‍मीर पोलिसांनी आज दहशतवादी हल्ल्याचा कट उधळवून टाकत लष्करे तैयबाच्या तीन दहशतवाद्यांना ठार मारले. श्रीनगर शहराजवळ झालेल्या कारवाईत पोलिसांनी हे यश मिळविले.

श्रीनगरजवळ तीन दहशतवादी ठार; मोठा शस्त्रसाठा जप्त

श्रीनगर : जम्मू-काश्‍मीर पोलिसांनी आज दहशतवादी हल्ल्याचा कट उधळवून टाकत लष्करे तैयबाच्या तीन दहशतवाद्यांना ठार मारले. श्रीनगर शहराजवळ झालेल्या कारवाईत पोलिसांनी हे यश मिळविले.

गुप्तचरांनी दिलेल्या माहितीच्या आधारावर जम्मू-काश्‍मीर पोलिसांचे विशेष कृती दल आणि केंद्रीय राखीव पोलिस दल (सीआरपीएफ) यांनी संयुक्त मोहीम राबवत एका अर्धवट बांधलेल्या इमारतीला वेढा घातला आणि अत्यंत कुशल कारवाई करत इमारतीत असलेल्या तीनही दहशतवाद्यांना ठार मारले. चार तास चाललेल्या या कारवाईवेळी झालेल्या चकमकीत चार जवान जखमी झाले असून, त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे पोलिसांनी सांगितले. या इमारतीत रायफल्स आणि मोठा शस्त्रसाठा आढळला. यावरून या दहशतवाद्यांचा लवकरच, बहुधा राजधानी हलविल्यानंतर सात मे रोजी श्रीनगरमधील सरकारी कार्यालये उघडण्याच्या दिवशी मोठा हल्ला करण्याचा कट होता, हे दिसून येत असल्याचेही पोलिसांनी सांगितले. मारले गेलेल्या तीन दहशतवाद्यांपैकी एक जण स्थानिक होता.

दरम्यान, येथील रुग्णालयात अदिल अहमद यादू या युवकाला दाखल केले असता तो मृत असल्याचे डॉक्‍टरांनी घोषित केले. रस्ते अपघातात जखमी झाल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्‍टरांचे म्हणणे असले, तरी जवानांच्या गोळीबारात तो मारला गेला असल्याचा काही स्थानिकांचा दावा आहे. त्यामुळे येथील वातावरण तणावग्रस्त झाले आहे. मात्र, उत्तरीय तपासणीतही त्याच्या शरीरावर गोळी मारल्याची कोणतीही खूण नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

दहशतवाद्यांचा पोलिसांवर हल्ला
पुलवामा : दहशतवाद्यांनी आज येथील राहमू गावात एका पोलिस अधिकाऱ्यावर गोळीबार केला. या हल्ल्यात अधिकारी गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

Web Title: Police of Jammu and Kashmir police cut off the attack