

Police Corruption Case
Esakal
पीएसआयने उत्पन्नापेक्षा जास्त माया जमवल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी चौकशी केली असता उत्पन्नापेक्षा ४४ लाख रुपये जास्त खर्च केल्याचं आढळून आलं. उत्तर प्रदेशात रामपूरमधील बिलासपूर कोतवाली इथं ड्युटीवर असताना पीएसआयने उत्पन्नापेक्षा ४४ लाख रुपयांहून अधिक खर्च केल्याचं दक्षता विभागाच्या तपासात समोर आलं आहे. या अतिरिक्त रकमेच्या स्रोताचे कारण देता आलं नाही. त्यामुळे पीएसआयविरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली आहे.