पश्चिम बंगालमध्ये जमावाचा पोलिस ठाण्यावर हल्ला

श्‍यामल रॉय : सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 30 जानेवारी 2017

कोलकाता : बर्दवान जिल्ह्यातील औंस गावात असलेल्या पोलिस ठाण्यावर संतप्त जमावाने आज हल्ला केल्याची घटना घडली. जमावाने पोलिस ठाण्याला लावलेल्या आगीत महत्त्वाची कागदपत्रे जळून खाक झाली असून, यादरम्यान अनेक पोलिस कर्मचारीही जखमी झाले आहेत.

एका शाळेच्या जागेत अवैध बांधकाम केल्याप्रकरणी त्याच शाळेतील एका कर्मचाऱ्यास पोलिसांनी अटक केली होती. यावरून संतप्त झालेल्या जमावाने पोलिस ठाण्याला लक्ष्य केले. जमावाने पोलिस कर्मचाऱ्यांना हुसकावून लावत त्यांची वाहने पेटवून दिली. नंतर जमावाने पोलिस ठाण्यालाही आग लावून तेथील सर्व कागदपत्रे जाळून टाकली. या हल्ल्यात काही कर्मचारी जखमी असून, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

हिंसाचारासारख्या इतर घटनांमध्ये सरकारी तसेच खासगी मालमत्तेचे नुकसान करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जाईल, असा इशारा मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी शनिवारी दिला होता आणि त्याच्या दुसऱ्या दिवशीच हा प्रकार घडला. दरम्यान, काही दिवसांपूर्वी भांगोर येथील पोलिस ठाण्यावरही अशा प्रकारचा हल्ला झाला होता.

...अन्‌ अश्रू अनावर झाले
या हल्ल्यानंतर पत्रकारांना याबाबतची माहिती देताना संबंधित पोलिस ठाण्याच्या मुख्य अधिकाऱ्यास अश्रू अनावर झाले. अनेक वृत्त वाहिन्यांवरून हा प्रकार प्रक्षेपित करण्यात आला.

Web Title: police stations attacked in west bengal