Atiq Ahmed Case : पोलिसांनी अतिक अहमद आणि अशरफला वेगवेगळ्या वाहनांतून नेले, काय आहे प्रकरण?

Atiq Ahmed Case
Atiq Ahmed Case

उमेश पाल हत्याकांडातील आरोपी माफिया अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ पोलिसांच्या ताब्यात आहेत. पोलिसांनी केलेल्या चौकशीत महत्वाती माहिती समोर आली आहे. या प्रकरणी अधिक माहिती गोळा करण्यासाठी पोलिसांनी माफिया अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ यांना वेगवेगळ्या वाहनांतून प्रयागराजच्या पूरमुफ्ती पोलीस ठाण्यात नेले आहे.

अतिक आणि अशरफसह पोलिस फतेहपूर किंवा कौशांबीपर्यंत देखील जाऊ शकतात. यापूर्वी पोलिसांना अतिकचा शार्प शूटर अब्दुल कवी याच्याकडून शस्त्रांचा मोठा जप्त केला होता. त्यामुळे जप्त केलेल्या शस्त्रांची ओळख पटवण्यासाठी पोलीस अतिक अश्रफ याला कौशांबी येथे घेऊन जाऊ शकतात.

राजुपाल हत्याकांडातील मोस्ट वाँटेड अब्दुल कवी याने ५ एप्रिल रोजी लखनौ येथील सीबीआय न्यायालयात आत्मसमर्पण केले होते. तो कौशांबीच्या सराय अकिल पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भाखंडा गावचा रहिवासी आहे.

Atiq Ahmed Case
Shivani Wadettiwar : "बलात्काराला राजकीय हत्यार म्हणणारे सावरकर प्रेरणास्थान कसे?" शिवानी वडेट्टीवारांचे विधान

फतेहपूरमध्ये अतिकच्या जवळच्या नातेवाईकांवरही छापे टाकले जात आहेत. उमेश पाल हत्येप्रकरणी वापरण्यात आलेल्या शस्त्रासंदर्भात फतेहपूरमधील पनी आणि चौधराना भागात घरांवर कारवाई सुरू आहे. पोलिसांनी अतिकच्या तीन जवळच्या मित्रांनाही ताब्यात घेतले आहे. आज तकने याबाबत वृत्त दिले आहे.

Atiq Ahmed Case
Supreme Court : सुप्रीम कोर्टाच्या चुकीमुळे ९८ कोटींचा घोटाळा, सरन्यायाधिशांना कळताच, बदलला निर्णय

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com