Gourav Vallabh: संबीत पात्रांना शून्याचा हिशोब शिकवणारा काँग्रेस प्रवक्ता भाजपमध्ये, कोण आहेत गौरव वल्लभ?

Sambit Patra: संबीत पात्रा यांना पाच ट्रिलियनमध्ये किती शून्य असतात असा प्रश्न विचारून देशभरात चर्चेत आलेले प्रा. गाैरव वल्लभ यांनी पक्षाला रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
Who Is Gourav Vallabh
Who Is Gourav VallabhEsakal

Political And Personal Career Of Gourav Vallabh:

लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत काँग्रेस पक्षाला सातत्याने धक्के बसत आहेत. गेल्या काही दिवसांपासून अनेक नेत्यांनी पक्षाची साथ सोडली आहे. अशात काँग्रेसला आणखी एक धक्का बसला आहे.

काँग्रेसचे तडफदार प्रवक्ते आणि भाजपच्या संबीत पात्रा यांना पाच ट्रिलियनमध्ये किती शून्य असतात असा प्रश्न विचारून देशभरात चर्चेत आलेले प्रा. गाैरव वल्लभ यांनी पक्षाला रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

'काँग्रेस पक्ष आज ज्या दिशाहीन मार्गाने पुढे जात आहे, ते मला पटत नाही. मी सनातनविरोधी नारे देऊ शकत नाही किंवा सकाळ-संध्याकाळ देशाच्या संपत्ती निर्माण करणाऱ्यांना शिवीगाळ करू शकत नाही. त्यामुळे मी काँग्रेस पक्षाच्या सर्व पदांचा आणि प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे, असे पत्र वल्लभ यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांना लिहिले आहे.

राजकारणात प्रवेश

2017 मध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश करत गौरव वल्लभ यांनी राजकीय कारकिर्दीचा श्रीगणेशा केला. त्यानंतर लगेचच काँग्रेस पक्षाने त्यांची मीडिया पॅनेलचे सदस्य म्हणून नियुक्ती केली. पुढे आपल्या कामगिरीने पक्षाला प्रभावित करत त्यांनी प्रवक्तेपदापर्यंत झेप घेतली. तसेच दोन वेळा काँग्रेसकडून निवडणुकाही लढवल्या.

सीए आणि अर्थशास्त्राचे प्राध्यापक

गेली काही वर्षे काँग्रेसचा किल्ला लढवणारे गौरव वल्लभ पेशाने चार्टर्ड अकाउंटंट आणि अर्थशास्त्राचे प्राध्यापक आहेत.

गौरव वल्लभ यांची एकूण संपत्ती 11,56,59,986 रुपये इतकी आहे. गौरव वल्लभ यांच्या बँकांमध्ये एकूण ठेवी 1,57,89,600 रुपये आहेत. तर बाँड, डिबेंचर आणि कंपन्यांच्या शेअर्समध्ये त्यांची गुंतवणूक सुमारे एक कोटी रुपये आहे. गौरव वल्लभ यांच्याकडे NSS, PFF सारख्या बचत योजनांमध्ये 72,28,111 रुपयांच्या ठेवी आहेत.

वल्लभ यांनी गेल्या वर्षी राजस्थान विधानसभा निवडणूक लढवताना आपल्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात ही माहिती दिली होती.

Who Is Gourav Vallabh
Gaurav Vallabh Resigns: लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसला मोठा धक्का, गौरव वल्लभ यांचा राजीनामा! दिलं 'हे' कारण

दोनदा पराभव

गौरव वल्लभ यांनी आतापर्यंत दोन वेळा राजकीय मैदानात आपले नशीब आजमावले आहे. यामध्ये दोन्ही वेळा त्यांना पराभवाची चव चाखावी लागली होती.

वल्लभ यांनी 2019 मध्ये पहिल्यांदा झारखंडमधून विधानसभा निवडणूक लढवली. तिथे ते तत्कालीन मुख्यमंत्री रघुवर दास यांच्याकडून पराभूत झाले होते. यानंतर गौरव वल्लभ यांनी 2023 मध्ये राजस्थानातील उदयपूरमधून विधानसभा निवडणूक लढवली. इथेही त्यांना भाजपच्या ताराचंद जैन यांच्याकडून 32 हजारांहून अधिक मतांनी पराभव स्वीकारावा लागला.

Who Is Gourav Vallabh
Arvind Kejriwal: मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना मोठा दिलासा; CM पदावरून हटवण्याची याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली

गौरव वल्लभ, संबित पात्रा आणि शून्याचा खेळ

एका टीव्हीवरील कार्यक्रमादरम्यान गौरव वल्लभ यांनी भाजप नेते संबित पात्रा यांना एक अशा प्रश्न विचारला होता की, त्याची चर्चा देशभर झाली होती.

संबित पात्रा या चर्चेदरम्यान मोदी सरकारच्या 5 ट्रिलियन अर्थव्यवस्थेच्या टार्गेटबद्दल बोलत होते. तेव्हा वल्लभ यांनी पात्रा यांना 5 ट्रिलियनमध्ये किती शून्य असतात हे माहित आहे का, असा प्रश्न केला. दोन-तीन वेळा विचारल्यानंतर पात्रा यांनी प्रश्न टाळण्याचा प्रयत्न केला तेव्हा गौरव वल्लभ यांनीच सांगितले होते की, 5 ट्रिलियनमध्ये 12 शून्य असतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com