Political Controversy : राहुल गांधींनीही माफी मागावी, भाजपची मागणी
Maharashtra Elections : महाराष्ट्र निवडणूक डेटातील त्रुटीची कबुली देत सीएसडीएसचे संजय कुमार यांनी माफी मागितली असून, त्याच पोस्टवरून आरोप करणाऱ्या राहुल गांधींनीही माफी मागावी, अशी मागणी भाजपने केली आहे.
नवी दिल्ली : महाराष्ट्रातील निवडणुकांच्या अनुषंगाने समाज माध्यमावर जो डेटा देण्यात आला होता. त्यात त्रुटी असल्याचे सांगत ‘सीएसडीएस’ संस्थेचे पदाधिकारी संजय कुमार यांनी माफी मागितली आहे. संजय कुमार यांनी समाज माध्यमावरील संबंधित पोस्टही हटविली आहे.