Kailash Vijayvargiya statement
esakal
राजकीय गरज होती म्हणून आम्ही अनेक सरकारी योजना जाहीर केल्या, मात्र आता त्या पूर्ण करणं कठीण आहे, असं विधान मध्यप्रदेशमधील भाजपाचे मंत्री कैलाश विजयवर्गीय यांनी केलं आहे. भोपाळमधील एका बैठकीत बोलताना त्यांनी यासंदर्भात भाष्य केलं. त्यांच्या या विधानानंतर आता राजकीय विविध चर्चा सुरु झाल्या आहेत. काँग्रेसने त्यांच्या विधानानंतर भाजपावर जोरदार टीकाही केली आहे.