विष्णुपद मंदिरात मुस्लिम मंत्र्याचा प्रवेश: मंदिराचा गाभारा धुतला गंगेच्या पाण्याने

दिरातील भक्तांनी आणि पांडा समाजात संताप व्यक्त केला आहे
bihar
biharesakal

बिहार मधील गसा मधील विष्णुपद मंदिर मध्ये सोमवारी मुख्यमंत्री नितीश कुमार गेले होते, त्यांनी गाभाऱ्यात जावून आभिषेक केला, त्यांच्या सोबत माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री इस्रायल मन्सूरी मंदिराच्या गाभाऱ्यात आले होते. मात्र, इस्रायल मन्सूरी यांच्या मंदिर प्रवेशाचा मुद्दा चांगलाच वादात सापडला आहे. मंदिरातील भक्तांनी आणि पांडा समाजातील नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.

त्यांनंतर त्या मंदिराला गंगेच्या पाण्याने शुद्ध करण्यात आले, व मंदिरातील देवाला भोग अर्पण करण्यात आले. या प्रकरणी विष्णुपद मंदिर व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शंभूलाल विट्ठल म्हणाले की, हिंदू नसलेल्या इतर लोकांनी प्रवेश करण्याची परंपरा खंडित झाली आहे. ते म्हणाले की, येथे मोठ्या फलकांवर हिंदूं नसलेल्या लोकांना मंदिरात प्रवेश नाही. असे लिहिलेले आहे, तरीही मंदिराच्या गभाऱ्यात मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यासह माहिती तंत्रज्ञान मंत्री मोहम्मद मन्सूरी यांचा प्रवेश पूर्णपणे चुकीचा आहे.

हळुहळु हा मुद्दा आता मंदिरा पुरता न राहता आता त्याला राजकीय वळण देण्यात आले आहे. एकीकडे विश्व हिंदू परिषदेने या घटनेवर सरकारने माफी मागावी असे सांगितला आहे. तर विरोधी पक्ष भाजपने देखील जोरदार टिका केली आहे. बिहारचे भाजप नेते गिरिराज सिंह यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, "जेव्हा राज्यकर्ते नास्तिक आणि हिंदूविरोधी बनतील, तेव्हा बिहारमध्ये धर्माचे रक्षण कसे होईल?

एका मुस्लिम व्यक्तीसोबत विष्णुपद मंदिरात प्रवेश करणारे नितीश कुमार हे हेतुपुर्वक मंदिराची पवित्रता भंग करत आहे. आणि त्यांनी सनातनचा अपमान केला आहे. मात्र, या मुद्द्यावर जेव्हा उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांना विचारण्यात आले की, एक अहिंदू मंदिरात कसा प्रवेश करतो, तेव्हा ते म्हणाले की, हा वाईट मुद्दा आहे. आणि खोट बोलणारे पक्ष असे मुद्दे मांडत असतात.

दुसरीकडे, मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या जवळचे समजले जाणारे डॉ. अशोक चौधरी म्हणाले की, इस्रायल मन्सूरी हे प्रभारी मंत्री आहेत आणि त्यामुळेच ते मंदिरात गेले कारण त्यांना या प्रवेशाची माहिती नसेल. मुख्यमंत्री नितीशकुमार सोमवारी रबर डॅमची पाहणी करण्यासाठी गेले होते. त्यांच्यासोबत जिल्ह्याचे पालकमंत्री इस्रायल मन्सूरी हे सुध्दा होते, ज्यांना नुकतेच महागठबंधन सरकारमध्ये माहिती व प्रसारण मंत्री करण्यात आले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com