esakal | जड्डूच्या घरात मास्कवरुन राजकारण; नणंद-भावजयमध्ये रंगला सामना
sakal

बोलून बातमी शोधा

Rivaba, Ravindra Jadeja and sister Naina Jadeja

जड्डूच्या घरात मास्कवरुन राजकारण; नणंद-भावजयमध्ये रंगला सामना

sakal_logo
By
सुशांत जाधव

भारतीय क्रिकेट संघातील अष्टपैलू रविंद्र जाडेजाच्या कुटुंबातील कलह चव्हाट्यावर आला आहे. जाडेजाची पत्नी रिवा आणि बहिण आणि नयना यांच्यात मास्कच्या मुद्यावरुन वातावरण तापले आहे. रविंद्र जाडेजा याची पत्नी भाजपमध्ये आहे. दुसरीकडे जड्डूची बहिण नयना जाडेजा या काँग्रेसच्या नेत्या आहेत. या दोघींमध्ये सध्या राजकीय सामना रंगला आहे.

स्थानिक प्रसारमाध्यमातील वृत्तानुसार, गुजरातमधील एका राजकीय कार्यक्रमावरून रिवा जाडेजा आणि नयना जाडेजा यांच्यात शाब्दिक वादावादीला सुरुवात झाली. रिवा यांच्या राजकीय कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. यावेळी रीवा यांनी मास्कही व्यवस्थितीत घातला नव्हता.

हेही वाचा: राष्ट्रध्वजाचा अवमान केल्याप्रकरणी MIM खासदार ओवैसींवर गुन्हा

हा मुद्दा काँग्रेसच्या नेत्या असलेल्या नयना जाडेजा यांनी उचलून धरला आहे. अशा लोकांमुळे कोरोनाची तिसरी लाट आली आहे, असा टोला त्यांनी रीवा सोलंकी-जाडेजा यांना लगावला आहे. यापूर्वी देखील रीवा सोलंकी-जाडेजा मास्क न घातल्यामुळे चर्चेत आल्या होत्या. मास्क न घातल्यामुळे पोलिसांनी त्यांचा रस्ता अडवल्याची चर्चा चांगलीच गाजली होती.

हेही वाचा: फूटपाथवर चहा विक्री ते फाईव्हस्टार शांग्रिला; साहित्यिकाचा प्रवास

नयना जाडेजा यांनी 14 एप्रिल 2019 मध्ये राजकोट येथे काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यापूर्वीच महिन्याभरापूर्वी रिवा सोलंकी-जाडेजा यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. रिवा यांना रविंद्र जाडेजाची पाठिंबा आहे. दुसरीकडे नयाना यांनी आपल्या वडिलांचा पाठिंबा आहे.

loading image
go to top