Rahul Gandhi: मोदीजी देवालाही समजावून सांगू शकतील, अमेरिकेत राहुल गांधींचे मोठं वक्तव्य

राहुल गांधी अमेरिका दौऱ्यावर आहेत.
Rahul Gandhi: मोदीजी देवालाही समजावून सांगू शकतील, अमेरिकेत राहुल गांधींचे मोठं वक्तव्य

आता भारतात राजकारण करणे सोपे नाही, मोदीजी देवालाही समजावून सांगू शकतात. असं मोठं वक्तव्य अमेरिकेमध्ये काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलं आहे.

राहुल गांधी मंगळवारी 10 दिवसांच्या परदेशी दौऱ्यावर आहेत. सध्या अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्को येथे पोहोचले आहेत. राहुल गांधी सॅन फ्रान्सिस्कोमध्ये भारतीयांना भेटले. यावेळी त्यांनी अनेक मुद्यांवर भाष्य केलं आहे. तसेच देशातील राजकारणासंदर्भातही त्यांनी मोठं वक्तव्य केलं.

काय म्हणाले राहुल गांधी?

भारतातील राजकारणाला आता वेगळं वळण लागलं आहे. लोकांना धमक्या दिल्या जात आहेत. एजन्सी वापरल्या जात आहेत. अशा स्थितीत भारतात राजकारण करणे आता सोपे राहिलेले नाही. अशा परिस्थितीत भारत जोडो यात्रेचा प्रवास अवलंबला. असे राहुल गांधी यांनी यावेळी सांगितले.

Rahul Gandhi: मोदीजी देवालाही समजावून सांगू शकतील, अमेरिकेत राहुल गांधींचे मोठं वक्तव्य
Maharashtra Politics: मध्यरात्री फडणवीस वर्षा बंगल्यावर; राजकीय घडामोडींना वेग

भारतात असे काही लोक आहेत ज्यांना वाटते की त्यांना प्रत्येक गोष्टीबद्दल सर्वकाही माहित आहे. त्यापैकी एक म्हणजे मोदीजी. त्यांना असे वाटते की त्यांना सर्वकाही माहित आहे. ब्रह्मांडात काय चालले आहे हे मोदीजी देवालाही समजावून सांगू शकतील. ते शास्त्रज्ञाला विज्ञान आणि इतिहासकाराला इतिहास समजावून सांगू शकतात. अशा शब्दात राहुल गांधींनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला.

Rahul Gandhi: मोदीजी देवालाही समजावून सांगू शकतील, अमेरिकेत राहुल गांधींचे मोठं वक्तव्य
RBI Report : फसवणूक वाढली, पण रक्कम घटली; रिझर्व्ह बँकेचा अहवाल : कठोर उपाययोजनेची पावले टाकणार

अगदी काहीही कुणालाही समजावू शकतात. पण मुळात असं आहे की त्यांना काहीही माहित नाही. कारण आयुष्यात तुम्हाला कशाची माहिती हवी असेल तर तुम्हाला आधी ऐकून घ्यावं लागतं. मी भारत जोडो यात्रेत हेच शिकलो आहे की प्रत्येकाकडून काहीतरी शिकलो आहे” असं म्हणत राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना टोला लगावला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com