UP Election Poll | पाचव्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात, 692 उमेदवारांचे देव पाण्यात

Yogi Adityanath
Yogi Adityanathsakal

#UttarPradeshElections : उत्तर प्रदेश निवडणूक अंतिम टप्प्यात असून सात टप्प्यांमधील पाचव्या मतदानाच्या टप्प्याला सुरुवात झाली आहे. यूपीतील 12 जिल्ह्यांमधील 61 विधानसभा मतदारसंघात हे मतदान पार पडत आहे. 692 उमेदवार रिंगणात आहेत. उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य, मंत्री सिद्धार्थनाथ सिंह, काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या नेत्या आराधना मिश्रा आणि अन्य प्रमुख नेत्यांचे भवितव्य आज मतदार ठरवणार आहेत. (UP Election fifth Stage Voting)

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यासाठी रविवारी सकाळी ७ वाजता ६१ मतदारसंघांमध्ये मतदानाला सुरुवात झाली. अयोध्या, सुलतानपूर, चित्रकूट, प्रतापगड, कौसांबी, प्रयागराज, बाराबाकी, बहराई,इ. अशा १२ जिल्ह्यांतील एकूण ६१ विधानसभा मतदारसंघात मतदानाला सुरुवात झालीय. गोंडा, अमेठी आणि रायबरेलीतही मतदार बाहेर पडत असल्याचं चित्र आहे.

10 मार्चला जनतेच्या आशीर्वादाने अहंकाराच्या आकाशात भरारी घेणारी अखिलेश यादव यांची सायकल बंगालच्या उपसागरात कोसळणार आहे. त्यांची सायकल आधी सैफईला गेली होती आणि आता ती बंगालच्या उपसागरात जाईल, असा खोच टोला विद्यमान उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी लगावला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com