प्रदूषणामुळे आयुष्य कमी होत नाही - जावडेकर

पीटीआय
शनिवार, 7 डिसेंबर 2019

‘केंद्राकडून राज्यांना अद्याप मदत नाही’
अवकाळी पाऊस आणि पूरस्थितीमुळे शेतकऱ्यांच्या नुकसानभरपाईसाठी केंद्र सरकारने अद्यापपर्यंत राज्यांना कोणतीही मदत पुरवली नसल्याचा आरोप विरोधी पक्षांमधील खासदारांनी लोकसभेत केला. ‘विविध कारणांमुळे होणारे पीक नुकसान आणि त्याचा शेतकऱ्यांवर होणारा परिणाम’, या विषयावरील चर्चेत भाग घेताना विरोधी पक्षातील खासदारांनी केंद्र सरकारवर हा आरोप केला.

नवी दिल्ली - प्रदूषणामुळे आयुष्यमान कमी होते असा दाखला कोणत्याही भारतीय अभ्यासानुसार समोर आलेला नाही, असे केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी शुक्रवारी लोकसभेत सांगितले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

लोकसभेत विचारलेल्या एका प्रश्‍नाचे उत्तर देताना ते म्हणाले की, कोणत्याही प्रदूषणाचा परिणाम थेटपणे लोकांच्या आयुष्यावर होतो, असा दाखला देणारा कोणताही दाखला भारतीय अभ्यासानुसार समोर आलेला नाही. त्यामुळे लोकांमध्ये कसल्याही प्रकारची भीती निर्माण होईल, असे कोणतेही विधान आपण करू नये. तसेच सरकार प्रदूषणाला आळा घालण्यासाठी प्रयत्नशील असून, या प्रयत्नांना यश मिळत असल्याचेही त्यांनी या वेळी नमूद केले. 

सत्ता स्थापनेनंतर पहिल्यांदाच होणार नरेंद्र मोदी-उद्धव ठाकरे भेट; पण कुठं?

लोकांचे आयुष्यमान प्रदूषणामुळे कमी होत असल्याचे दर्शविणाऱ्या एका अभ्यासाचा संदर्भ देताना ते म्हणाले की, असे सर्वेक्षण पहिल्या पिढीच्या आकडेवारीवर आधारित असून, भारतीय संस्थांनी केलेल्या अभ्यासांमध्ये अशा प्रकारचा कुठलाही दाखला नाही.

१५.८६ लाख कर्करुग्णांची नोंद 
देशात गेल्यावर्षी १५.८६ लाख कर्करुग्णांची नोंद करण्यात आल्याची माहिती आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी लोकसभेत दिली. तसेच भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या राष्ट्रीय कर्करोग नोंदणी कार्यक्रमाकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार २०१८ मध्ये १५ लाख ८६ हजार ५७१ रुग्णांची नोंदणी झाली आहे, तर राज्यांच्या सरकारी रुग्णालयांतील कर्करोगाच्या रुग्णांविषयीची माहिती केंद्राकडे नसल्याचेही त्यांनी या वेळी सांगितले.
''भारत आता मुस्लिमांचा देश राहिलेला नाही''

किसान सन्मान योजनेचा फायदा
पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा (पीएम किसान) फायदा आतापर्यंत देशभरातील ७.५ कोटी शेतकऱ्यांना झाला आहे, अशी माहिती कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी राज्यसभेत दिली. तसेच पश्‍चिम बंगाल वगळता इतर सर्व राज्ये ही योजना राबवत असल्याचेही त्यांनी या वेळी सांगितले. पंतप्रधान किसान योजनेंतर्गत सरकार शेतकऱ्यांना वर्षाकाठी सहा हजार रुपये पुरवते, असेही त्यांनी या वेळी सांगितले.

सुप्रियो यांना रोखले
लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी शुक्रवारी केंद्रीय मंत्री बाबूल सुप्रियो यांना प्रश्नोत्तराच्या तासात चर्चा करण्यापासून रोखले. प्रश्‍नोत्तराच्या तासात सुप्रियो हे केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या आसनाजवळ जात त्यांच्याशी बोलत होते. त्या वेळी सभापतींनी त्यांना रोखत प्रश्‍नोत्तराचा तास सुरू असताना चर्चा केली जाऊ नये, अशी सूचना केली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pollution does not reduce life prakash javadekar