Pope Francis : नव्या पोप निवडीची प्रक्रिया सुरू; सिस्टिन चॅपेलमध्ये होणार बैठक, गुप्त पद्धतीने होते मतदान
New Pope : पोप फ्रान्सिस यांचे ८८ व्या वर्षी निधन झाले असून, आता नव्या पोपच्या निवडीची प्रक्रिया सुरू झाली आहे. सिस्टिन चॅपेलमध्ये कार्डिनल्सच्या गुप्त बैठकीत मतदानाद्वारे ही निवड होणार आहे.
रोम : न्यूमोनियामुळे श्वासोच्छ्वास घेण्यास अडथळे येत असल्याने फेब्रुवारीपासून आजारी असलेले पोप फ्रान्सिस (वय ८८) यांचे सोमवारी पहाटे निधन झाले. त्यांच्या निधनानंतर नव्या पोपची निवड करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.