BJP MP : काँग्रेसनं लोकसंख्या नियंत्रण विधेयक आणलं असतं, तर मला 4 मुलं झाली नसती; भाजप खासदाराचा हल्लाबोल

'काँग्रेसच्या काळात लोकसंख्या नियंत्रणाबाबत जनजागृती झाली नाही.'
Ravi Kishan On Population
Ravi Kishan On Populationesakal
Summary

'काँग्रेसच्या काळात लोकसंख्या नियंत्रणाबाबत जनजागृती झाली नाही.'

Ravi Kishan On Population : लोकसंख्या नियंत्रण विधेयकावरून (Population Control Bill) देशात पुन्हा एकदा वाद सुरू झालाय. हे पाहता आता भाजप खासदारानं वाढत्या लोकसंख्येला काँग्रेस सरकारच जबाबदार असल्याचं म्हटलंय.

अभिनेते आणि राजकारणी रवी किशन यांनी एका खासगी वाहिनीवर लोकसंख्या नियंत्रण विधेयकाबाबत मोठं वक्तव्य केलंय. गोरखपूरचे भाजप खासदार रवी किशन यांनी काँग्रेसवर (Congress Government) आरोप केलाय की, आज मी 4 मुलांचा बाप आहे. मला 4 मुलं आहेत, ही चूक नाही. मात्र, काँग्रेस सरकारनं लोकसंख्या नियंत्रण विधेयक आणलं असतं तर आम्हाला चार अपत्ये झाली नसती. पहिल्या आणि दुसऱ्या प्रसूतीनंतर पत्नीची प्रकृती ढासळू लागली होती, असंही त्यांनी सांगितलं.

Ravi Kishan On Population
Supreme Court : मुस्लिम मुलींच्या लग्नाबाबत सर्वोच्च न्यायालयानं धाडली केंद्राला नोटीस; चार आठवड्यांत मागितलं उत्तर

काँग्रेस सरकारवर आरोप

रवी किशन पुढं म्हणाले, यापूर्वीच्या सरकारनं या बाबतीत काळजी घ्यायला हवी होती. त्यांनी लोकसंख्या नियंत्रणासाठी कायदा केला असता तर आज आम्हाला चार अपत्ये झाली नसती. काँग्रेसच्या काळात लोकसंख्या नियंत्रणाबाबत जनजागृती झाली नाही आणि त्यामुळंच आता भाजप सरकारला लोकसंख्या नियंत्रण विधेयक आणावं लागलं आहे.

Ravi Kishan On Population
VIDEO : गुंडागर्दीची हद्दच! 100 हून अधिक तरुणांनी घरात घुसून डाॅक्टर मुलीला नेलं पळवून; कारण जाणून धक्काच बसेल!

संसदेत प्रस्ताव मांडणार

लोकसंख्या नियंत्रणाबाबत संसदेतही प्रस्ताव मांडणार असल्याचं भाजप खासदार म्हणाले. याशिवाय, देशातील वाढती लोकसंख्या लक्षात घेता, आता आपल्याला 4 मुलं असल्याचा पश्चाताप होत असल्याचंही त्यांनी मान्य केलं. चीनचा उल्लेख करून ते म्हणाले, तेथील लोकसंख्येवर नियंत्रण ठेवण्यात आलं आहे. आपल्या देशातील पूर्वीची सरकारं विचारशील असती तर पिढ्यानपिढ्या संघर्ष झाला नसता.

Ravi Kishan On Population
Credit Score: असा वाढवा तुमचा ‘क्रेडिट स्कोअर’

रवी किशन यांच्या 4 मुलं असल्याच्या वक्तव्याचा समाचार घेत काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनाटे यांनी ट्विट केलंय की, मुलं जन्माला येत राहिली आणि तुम्हाला या घटनेची माहिती नव्हती! किमान तुम्ही तीन मुली आणि एका मुलाचा बाप झालात. काँग्रेस नेत्यानं रवी किशन यांच्यावर पत्नीसोबत गैरवर्तन केल्याचाही आरोप केलाय.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com