
Pralhad Joshi : काँग्रेसने वीज कमी दिल्यामुळेच देशाची लोकसंख्या वाढली; केंद्रीयमंत्र्यांचं अजब विधान
नवी दिल्ली : कर्नाटक विधानसभा निवडणुकीला अजून काही कालावधी असला तरी राज्यातील राजकीय पारा चढू लागला आहे. दररोज विविध पक्षांचे नेते येथे काही ना काही विधाने करत आहेत, जे जोरदार चर्चेत आहेत.
आता मोदी सरकारमधील मंत्री प्रल्हाद जोशी यांनी एक असे विधान केले आहे, ज्याची लोक चेष्टा करत आहेत. केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी म्हणाले की, काँग्रेसने आपल्या सरकारच्या काळात कमी वीज दिली होती. या काळात काँग्रेस पक्षाला सर्वसामान्यांना पुरेशी वीज देता न आल्याने लोकसंख्येत मोठी वाढ झाली.
केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी म्हणाले की, काँग्रेसने आपल्या सरकारच्या काळात कमी वीज दिली होती. या काळात काँग्रेस पक्षाला सर्वसामान्यांना पुरेशी वीज देता न आल्याने लोकसंख्येत मोठी वाढ झाली.
कर्नाटकात भाजप नेत्यांचे दौरे अव्याहतपणे सुरू आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी 12 मार्च रोजी राज्याचा दौरा करणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी १२ मार्च रोजी कर्नाटकातील मांड्या आणि हुबळी-धारवाड जिल्ह्यांचा दौरा करणार आहेत. गेल्या रविवारी केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी याबाबत माहिती दिली होती.