खासदार दिल्लीत पॉझिटिव्ह तर जयपूरमध्ये निगेटिव्ह

वृत्तसंस्था
Monday, 14 September 2020

नागौर येथील खासदार आणि राष्ट्रीय लोकतांत्रिक पक्षाचे (आरएलपी) संयोजक हुनमान बेनीवाल यांचा कोरोनाचा अहवाल दिल्लीत पॉझिटिव्ह तर जयपूरमध्ये निगेटिव्ह आला आहे.

जयपूर (राजस्थान):  नागौर येथील खासदार आणि राष्ट्रीय लोकतांत्रिक पक्षाचे (आरएलपी) संयोजक हुनमान बेनीवाल यांचा कोरोनाचा अहवाल दिल्लीत पॉझिटिव्ह तर जयपूरमध्ये निगेटिव्ह आला आहे. दोन्ही अहवाल त्यांनी ट्विटरवून शेअर केले आहेत. दोन्ही अहवालांपैकी खरा कोणता मानावा? असा प्रश्न त्यांनी विचारला आहे.

होय, चीनमधूनच कोरोनाचा प्रसार; माझ्याकडे पुरावे...

संसदेचे पावसाळी अधिवेशन आजपासून सुरू झाले. त्यापुर्वी लोकसभा सदस्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. 17 खासदारांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. बेनीवाल यांनी ट्विटरवर अहवाल शेअर करताना म्हणाले की, 'मी लोकसभा परिसरात 11 सप्टेंबरला कोव्हिड-19 ची चाचणी केली, जी पॉझिटिव्ह आली. त्यानंतर जयपूर येथील एसएमएस हॉस्पिटलमध्ये 13 तारखेला चाचणी केली, जी नेगेटिव्ह आली आहे. दोन्ही अहवाल तुमच्यासोबत शेअर करत आहे. अखेर यातील कोणता रिपोर्ट खरा समजायचा?'

बेनीवाल यांनी सांगितले की, 'मी पुर्णपणे बरा असून, तिसरा अहवाल पण निगेटिव्ह आला आहे. क्वारंटाईन कालावधी पुर्ण केल्याची माहिती देखील त्यांनी दिली.' दरम्यान, जुलै महिन्यात बेनीवाल यांना कोरोनाची लागण झाली होती. याबाबतची माहिती त्यांनी स्वतः ट्विट करत दिली होती.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: positive in delhi negative in jaipur mp hanuman beniwal shares both coronavirus test reports