होय, चीनमधूनच कोरोनाचा प्रसार; माझ्याकडे पुरावे...

वृत्तसंस्था
Monday, 14 September 2020

जगभरात कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातला असून, अनेकांना जीव गमवावा लागला आहे. जगभरात 2 कोटींहून अधिक कोरोनाबाधित रुग्ण आहेत. चीनमधूनच कोरोना व्हायरसचा प्रसार झाला असून, याबाबतचे पुरावे माझ्याकडे आहेत, असा दावा चिनी शास्त्रज्ञाने केला आहे.

पेइचिंग : जगभरात कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातला असून, अनेकांना जीव गमवावा लागला आहे. जगभरात 2 कोटींहून अधिक कोरोनाबाधित रुग्ण आहेत. चीनमधूनच कोरोना व्हायरसचा प्रसार झाला असून, याबाबतचे पुरावे माझ्याकडे आहेत, असा दावा चिनी शास्त्रज्ञाने केला आहे.

मास्क विसरल्यावर झाली फजिती; फोटो व्हायरल

चीनच्या वुहानमधूनच कोरोना पसरल्याचा आरोप जगभरातील अनेक देश करत आहेत. हाँगकाँग स्कूलचे चीनचे व्हायरोलॉजिस्ट डॉ. ली-मेंग यान यांनी एका कार्यक्रमादरम्यान दावा केला आहे की, 'कोरोनाचा प्रसार होण्यास सुरू झाली नव्हती तेव्हा पेइचिंगमध्ये कोरोनाबाबत माहितीही मिळाली होती. माझ्याकडे पुरावे आहेत आणि हा व्हायरस मानवनिर्मित असल्याचे सिद्ध करू शकते. चिनी सरकारने सर्व माहिती सरकारी डेटाबेसमधून काढून टाकली आहे. वुहान मार्केटमध्ये कोव्हिड-19 पसरल्याची बातमी म्हणजे एक फसवणूक आहे. एक अहवाल प्रकाशित करणार असून, हा व्हायरस मानवनिर्मित असल्याचे पुरावे सादर केले जाणार आहेत.'

युवतीचा काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडिओ व्हायरल

डॉ. यान जीव वाचवण्यासाठी सध्या अमेरिकेत वास्तव्य करत आहेत. डॉ. यान म्हणाल्या की, 'वुहानचा मांस बाजार एक पडदा म्हणून वापरला जात आहे आणि हा व्हायरस नैसर्गिक नाही. वुहानच्या लॅबमधून कोरोना व्हायरस प्रसार झाला आहे. जीनोम सीक्वेन्स हा मानवी फिंगर प्रिंट सारखा आहे. हे या आधारावर ओळखले जाऊ शकते. या पुराव्याच्या आधारे, मी लोकांना सांगेन की कोरोना हा चीनच्या लॅबमधून कसा आला. पण, चीनच्या डेटाबेसमधून माहिती काढून टाकण्यात आली आहे. सहकार्‍यांना माझ्याबद्दल खोटी बातमी पसरण्यास सांगितले आहे. कोरोनाचा वाढता प्रसार आणि लोकांचा मृत्यू होत असताना लोकांपर्यंत सत्य पोहोचवण्याची नैतिक जबाबदारी आहे.'


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: chinese virologist claims covid19 made in wuhan lab