मुस्लीम व्यक्तीने अनाथ मुलीला सांभाळलं, हिंदू मुलाशी लग्न लावलं

Marriage
Marriageesakal
Summary

कर्नाटकच्या विजयपुरामधील एका मुस्लीम व्यक्तीने एका अनाथ हिंदू मुलीचे (orphaned Hindu Girl) पालनपोषण केले होते. आता त्याच मुलीचे वैदिक पद्धतीनुसार (vedic traditions) हिंदू मुलाशी लग्न लावून दिलं आहे.

बंगळुरु- कर्नाटकच्या विजयपुरामधील एका मुस्लीम व्यक्तीने एका अनाथ हिंदू मुलीचे (orphaned Hindu Girl) पालनपोषण केले होते. आता त्याच मुलीचे वैदिक पद्धतीनुसार (vedic traditions) हिंदू मुलाशी लग्न लावून दिलं आहे. महबूब मसली एका १८ वर्षीय हिंदू मुलीचे पालक आहेत. त्यांनी नुकतेच तिचे लग्न लावले आहे. त्यांनी शुक्रवारी हिंदू परंपरेनुसार एक हिंदू व्यक्तीसोबत पूजाचे लग्न लावले आहे. (positive story)

पूजा एक दशकांपूर्वी अनाथ झाली होती आणि त्यांच्या नातेवाईकांनी तिचे पालनपोषण करण्यास नकार दिला होता. त्यावेळी महबूब यांनी वडील म्हणून पूजाची जबाबदारी घेतली. महबूब दोन मुली आणि दोन मुलांचे वडील आहेत. तरीही त्यांनी पूजाचे पालक बनण्याचा निर्णय घेतला. महबूब यांनी म्हटलं की, माझी जबाबदारी आहे की तिचे लग्न तिच्या धर्माशी संबंधित व्यक्तीशी केले जावे.

Marriage
VIDEO: 'बचपन वाला प्यार' गाणं नेमकं आलं कुठून? जाणून घ्या

एका दशकापासून पूजा माझ्या घरी राहात आहे, पण मी कधीही तिला इस्लाम धर्माचे पालन करण्यास सांगितले नाही, तसेच मुस्लीम व्यक्तीशी लग्न करण्याची बळजबरी केली नाही. हे इस्लाम धर्माच्या सिद्धांताच्या विरोधात आहे, असं महबूब म्हणाले. त्यांनी एएनआय या वृत्तसंस्थेची बोलताना म्हटलं की, नवरदेवाच्या आई-वडिलांनी हुंडा न घेता आनंदाने पूजाचा स्वीकार केला. त्यांनी विविध समुदायांना सद्भावनेने राहण्यास सांगितलं आहे. मी समाजाला संदेश देऊ इच्छित आहे की, सर्वांनी एकोप्याने राहावे, असं ते म्हणाले.

Marriage
डेल्टा प्लस व्हेरिअंटवर कोव्हॅक्सिन ठरतेय प्रभावी - ICMR

महबूब शहरात सामाजिक सेवा आणि सांप्रदायिक सद्भावनेला चालना देण्यासाठी अनेक कार्यक्रमांचे आयोजन करत असतात. ते शहरात गणपती कार्यक्रमांचे आयोजन करण्यासाठी ओळखले जातात. पूजाने आभार व्यक्त करताना म्हटलं की, मी भाग्यवान आहे की मला असे महान आई-वडील मिळाले. त्यांनी मन:पूर्वक माझी काळजी घेतली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com