
PM Narendra Modi : PM मोदीविरोधी पोस्टर लावले म्हणून ६ जणांना अटक; १०० हून अधिक FIR दाखल
PM Narendra Modi News : राजधानी दिल्लीत ठिकठिकाणी मोदी हटाओ, देश बचाओ असे बॅनर्स लागले आहेत. या बॅनरची सध्या चांगलीच चर्चा सुरू आहे. याबद्दल पोलिसांनी ६ जणांना ताब्यात घेतलं असून १०० हून अधिक एफआयआर नोंदवण्यात आले आहेत. याबद्दल पोलीस अधिक तपास करत आहेत.
पोलिसांनी या प्रकरणी ६ जणांना ताब्यात घेतलं आहे. तर १०० हून अधिक एफआयआर नोंदवले आहेत. पोलिसांनी या ६ जणांची चौकशी केली आहे. त्यामध्ये एका राजकीय पक्षाने आम्हाला असं करण्यास सांगितल्याची कबुली यामधल्या काही व्यक्तींनी दिली आहे. त्यामुळे दिल्लीतलं राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. (PM Narendra Modi Posters in Delhi)
पोस्टर बनवल्यावर त्या पोस्टरवर छापखान्याचा नंबर दिला जातो. मात्र या पोस्टरवर कोणताही नंबर दिलेला नाही. त्यामुळे पोलीसांसमोर तपासाचं आव्हान आहे. आता सोशल मीडियावरही या पोस्टर्सची चर्चा होऊ लागली आहे. हे पोस्टर्स नेमके कोणी लावलेत याचा तपास पोलीस करत आहेत.