Covid-19 : पुन्हा लॉकडाऊन, पुन्हा मास्कसक्ती? मोदींनी कोरोनासंदर्भात बोलावली तातडीची बैठक | Prime Minister Narendra Modi to hold a high-level meeting today to review the Covid-related situation | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Narendra Modi
Covid-19 : पुन्हा लॉकडाऊन, पुन्हा मास्कसक्ती? मोदींनी कोरोनासंदर्भात बोलावली तातडीची बैठक

Covid-19 : पुन्हा लॉकडाऊन, पुन्हा मास्कसक्ती? मोदींनी कोरोनासंदर्भात बोलावली तातडीची बैठक

Covid-19 in India News : देशामध्ये गेल्या काही महिन्यांपासून कमी झालेला कोरोना विषाणूचा प्रभाव आता पुन्हा एकदा वाढताना दिसत आहे. या अनुषंगाने आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उच्चस्तरीय बैठक बोलावली आहे. त्यामुळे आता कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी पुन्हा लॉकडाऊन, मास्क लागणार का? याकडे देशाचं लक्ष लागून राहिलेलं आहे.

कोरोना प्रादुर्भावाची परिस्थिती आणि त्या अनुषंगाने सार्वजनिक आरोग्य यंत्रणेच्या सज्जतेचा आढावा पंतप्रधान नरेंद्र मोदी या बैठकीमध्ये घेणार आहे. यामध्ये आरोग्य विभागाशी संबंधित उच्चस्तरीय अधिकारी असतील. देशभरातल्या परिस्थितीचा रुग्णसंख्येचा पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi) आज आढावा घेतील. (PM Narendra Modi Called High Level Meeting)

गेल्या २४ तासांमध्ये देशात कोरोनाचे १,१३४ नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे राज्यातल्या उपचाराधीन रुग्णांची सध्या आता ७,०२६ वर पोहोचली आहे. तर ६६२ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. देशाचा रुग्ण कोरोनामुक्त होण्याचा दर (Recovery Rate) सध्या ९८.७९ टक्के आहे. (Covid-19 Update)

गेल्या २४ तासांत कोरोना प्रतिबंधक लसीच्या ७,६७३ मात्रा देण्यात आल्या. तर देशात आत्तापर्यंत २२० कोटींहून अधिक लसमात्रा देण्यात आल्या आहेत.