प्रात्यक्षिक परीक्षा ऑनलाईन होणार; सीबीएसईची निर्णय 

वृत्तसंस्था
Monday, 23 November 2020

परीक्षा मात्र ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहेत यासाठी सर्व शाळांना एकेक मोबाईल ॲप उपलब्ध करून दिले जाईल शाळांनी त्यावर प्रात्यक्षिक करणाऱ्या मुलांच्या गटांचे फोटो अपलोड करायचे आहेत.

नवी दिल्ली - केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (सीबीएसई) पुढील वर्षी होणाऱ्या (२०२१) १० वी आणि १२ वीच्या बोर्डाच्या प्रात्यक्षिक परीक्षांचे स्वरूप जाहीर केले आहे. या परीक्षा ऑनलाईन होतील आणि त्यासाठी शाळांना प्रत्येकी एक मोबाईल ॲप उपलब्ध करून दिले जाईल. कोरोनाचा कहर अजूनही सुरू असला तरीही पुढील वर्षी बोर्डाच्या लेखी परीक्षाही होणारच याचाही पुनरुच्चार मंडळाने केला आहे. 

देशाच्या विविध राज्यांमध्ये दिल्लीसह कोरोनाच्या साथीचे पुन्हा एकदा हाहाकार उडवण्यास सुरुवात केली असल्यामुळे पुढील वर्षी बोर्डाच्या परीक्षा रद्द कराव्यात अशी मागणी वेगवेगळ्या संस्थांकडून होत असतानाच सीबीएसईचे सचिव अनुराग त्रिपाठी यांनी २०२१ मध्ये बोर्डाच्या परीक्षा होणारच असे ठासून सांगितले आहे. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

नवीन शैक्षणिक धोरणावरील वेबिनारमध्ये बोलताना त्रिपाठी म्हणाले की, पुढील वर्षी प्रात्यक्षिक आणि लेखी अशा बोर्डाच्या दोन्ही परीक्षा घेण्यावर सीबीएससी ठाम आहे. परीक्षांचे आयोजन आणि उत्तर पत्रिकांची तपासणी या बाबतीतला निर्णय नंतर घेतला जाईल. पुढील वर्षी बोर्डाच्या परीक्षा ऑनलाईन घ्यायचा का याचाही निर्णय वरिष्ठ पातळीवरून घेताच लवकरच जाहीर करण्यात येईल. 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

परीक्षा मात्र ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहेत यासाठी सर्व शाळांना एकेक मोबाईल ॲप उपलब्ध करून दिले जाईल शाळांनी त्यावर प्रात्यक्षिक करणाऱ्या मुलांच्या गटांचे फोटो अपलोड करायचे आहेत. प्रत्येक मुलाचा चेहरा स्पष्ट यावा असे बंधनकारक करण्यात आले आहे. मुलांबरोबरच शिक्षक, परीक्षक आणि इतर संबंधित कर्मचाऱ्यांचेही फोटो याची मोबाईलवर शाळांनी डाऊनलोड करून मंडळाकडे पाठवायचे आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: practical exam will be online; CBSE decision