Praful Patel : ‘एआय’च्या विमान व्यवस्थापनात सुधारणा गरजेची; माजी नागरी विमान वाहतूक मंत्री पटेल, प्रवाशांनी घाबरायचे कारण नाही
Air India : अहमदाबाद विमान अपघातावर प्रफुल्ल पटेल यांनी टाटा समूहाच्या विमान व्यवस्थापनात सुधारणा करण्याची आवश्यकता व्यक्त केली. त्यांनी यामध्ये कोणत्याही प्रकारच्या घातपातास नाकारत प्रवाशांना घाबरण्याचे कारण नसल्याचे सांगितले.
अहमदाबाद येथे एअर इंडियाच्या एआय १७१ या विमानाला गुरुवारी झालेल्या अपघातानंतर, माजी नागरी विमान वाहतूक मंत्री खासदार प्रफुल्ल पटेल यांनी टाटा समूहाच्या विमान व्यवस्थापनात प्राधान्याने सुधारणा करण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले.