
Jairam Ramesh
Sakal
नवी दिल्ली : अमेरिकेच्या अध्यक्षांकडून पाकिस्तानचे फील्ड मार्शल असीम मुनीर यांची करण्यात आलेली स्तुती ही भारताच्या परराष्ट्र धोरणासाठी धोक्याची घंटा आहे, असे सांगतानाच घोषणा आणि उपदेश देण्याची वेळ निघून गेली आहे, अशी टीका काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केली. अमेरिका आणि अन्य काही देशांनी भारताविरोधात आव्हाने निर्माण केली असल्याचेही रमेश यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगितले.