esakal | प्रशांत भूषण माफी न मागण्यावर ठाम; सर्वोच्च न्यायालयाने निर्णय ठेवला राखून
sakal

बोलून बातमी शोधा

Prashant_Bhushan

प्रशांत भूषण यांनी केलेल्या अवमानप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने आपला निर्णय राखून ठेवला आहे.

प्रशांत भूषण माफी न मागण्यावर ठाम; सर्वोच्च न्यायालयाने निर्णय ठेवला राखून

sakal_logo
By
सकाळन्यूजनेटवर्क

नवी दिल्ली-  प्रशांत भूषण यांनी केलेल्या अवमानप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने आपला निर्णय राखून ठेवला आहे. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश एस ए बोबडे आणि सर्वोच्च न्यायालय प्रकरणी केलेल्या टिप्पणीवर ज्येष्ठ वकील आणि सामाजिक कार्यकर्ते प्रशांत भूषण यांनी माफी मागण्यास नकार दिला आहे. 

महाधिवक्ता के. के. वेणूगोपाल यांनी या प्रकरणी वादविवाद करताना प्रशांत भूषण यांना माफ करण्याची मागणी केली. प्रशांत भूषण यांना चेतावणी देऊन सोडण्यात यावे. पुन्हा भविष्यात असं करु नका, अशा सूचना देऊन त्यांना माफ करण्यात यावं. न्यायालयाने आपल्या अवमान अधिकाराचा वापर येथे करु नये, असं ते म्हणाले आहेत. यावर उत्तर देताना न्यायमूर्ती अरुन मिश्रा म्हणाले की, प्रशांत भूषण यांना आपण काही चूकी केल्याचं वाटत नाही. लोक चूका करतात. काहीवेळी खूप मोठ्या चूका करतात. पण त्यांना वाटत नाही की, त्यांनी काही चूक केली आहे. जर एखाद्याला आपण चूक केल्याचं वाटत नसले तर आपण काय करु शकतो? त्यामुळे त्यांना चेतावणी देऊन काहीही फायदा होणार नाही. 

प्रशांत भूषण यांनी जे उत्तर दिलं, ते जास्त अपमानकारक- सर्वोच्च न्यायालय

सरकारी वकील वेणूगोपाल म्हणाले, मला स्वत:ला प्रशांत भूषण यांच्याविरोधात तक्रार दाखली करायची होती. जेव्हा दोन सीबीआय अधिकारी भांडत होते, त्यावेळी त्यांनी बनावट कागदपत्रे गोळा केल्याचा आरोप केला होता. मात्र, नंतर त्यांनी माफी मागितली होती. लोकशाहीचे पालन करुया आणि त्यांना त्यांच्या वक्तव्यासाठी स्वातंत्र्य देऊया.

भूषण यांनी 100 पाणी स्पष्टीकरण सोमवारी न्यायालयात सादर केलं होतं. याच त्यांनी माफी मागण्यास नकार दिला आहे. माझे ट्वीट सद्भावनापूर्वक होते आणि त्यावर मी ठाम राहणार आहे. मी उपस्थित केलेल्या प्रश्नांवर न्याायलयाला उत्तरे देता आली नाहीत. माझं मत आहे की, जर मी माफी मागितली, तर तो माझ्या स्वाभिमानाचा अवमान होईल, असं भूषण म्हणाले होते.  भूषण यांनी ट्विटप्रकरणी दिलेले उत्तर वेदनादायी आहे. त्यांनी दिलेलं उत्तर अयोग्य आहे. 30 वर्ष अनुभव अससेल्या प्रशांत भूषण यांनी असं वागायला नको, असं न्यायलयाने म्हटलं.

भूषण यांना काय शिक्षा द्यावी याबाबत जेव्हा न्यायालयाने विचारलं, यावर वेणूगोपाल म्हणाले, त्यांना शिक्षा देऊन शहीद बनवू नका. न्यायालयाने कोणतीही शिक्षा दिली तर हा वाद सुरुच राहणार आहेत. न्यायालयाने त्यांना माफी दिली तरच हा वाद संपेल. 


 

loading image
go to top