भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांचा गड ढासळणार, प्रशांत किशोर विजयाच्या दिशेनं; भाजप उमेदवार पराभवाच्या छायेत

Prashant Kishor बिहारच्या बांकीपूर विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणुकीत भाजपच्या उमेदवाराला पराभवाचा धक्का बसण्याची शक्यता आहे. जन सुराज पक्षाचे प्रशांत किशोर आघाडीवर असून त्यांची विजयाच्या दिशेनं वाटचाल सुरू आहे.
Prashant Kishor

Prashant Kishor

Updated on

बिहार, गुजरात आणि मध्य प्रदेशात विधानसभेच्या प्रत्येकी एका जागेवर पोटनिवडणूक झाली. या निवडणुकीची मतमोजणी सुरू असून यातील बिहारच्या बांकीपूर मतदारसंघातील मतमोजणीकडे देशाचं लक्ष लागून राहिलं आहे. भाजपचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या बांकीपूरमध्ये जन सुराज पक्षाचे प्रशांत किशोर आघाडीवर आहेत. तर भाजप उमेदवार नीरज सिन्हा हे पिछाडीवर पडले आहेत. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांचा बांकीपूर हा पारंपरिक मतदारसंघ आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com