काँग्रेसची प्रशांत किशोर यांना 'ऑफर', 2024 साठी मास्टर प्लानही देणार | Prashant Kishor | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Prashant Kishor

काँग्रेसची प्रशांत किशोर यांना 'ऑफर', 2024 साठी मास्टर प्लानही देणार

नवी दिल्ली : काँग्रेसने निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर (Prashant Kishor) यांना पक्षात सामील होण्यास सांगितले असून त्यांनी सल्लागार म्हणून काम करू नये, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. काँग्रेसच्या आज पार पडलेल्या बैठकीनंतर काँग्रेसतर्फे किशोर यांनी वरील ऑफर देण्यात आल्याचे सांगितले जात आहे. महत्त्वाची बाब म्हणजे प्रशांत किशोर यांनीदेखील पक्षात सामील होण्यास स्वारस्य दाखवले असल्याची माहिती समोर येत आहे. याशिवाय 2024 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस 370 जागांवर लक्ष केंद्रित करेल, अशीदेखील माहिती सूत्रांनी दिली आहे. ममता बॅनर्जींच्या (Mamata Banerjee) बंगालच्या विजयानंतर, गेल्या वर्षी किशोर आणि गांधी कुटुंबातील संबंध ताणले गेले होते. त्यांनतर काँग्रेसने किशोर यांच्या एका माजी सहाय्यकाने काँग्रेसच्या निवडणूक प्रचाराची धुरा सांभाळली होती. मात्र, आता पुन्हा काँग्रेस आणि प्रशांत किशोर यांच्यात बैठक पार पडल्याने नव्या चर्चांना उधाण आले आहे. (Prashant Kishor News)

हेही वाचा: 'आमचे नाना लढले तर तोंडाला फेस आला, मी लढलो तर काय होईल?'

बैठकीदरम्यान, किशोर यांनी पक्षात असणाऱ्या कमकुवत गोष्टींचे आणि त्यामध्ये कशा सुधारणा करता येतील याबाद्दल तपशीलवार सादरीकरण केले. बैठकीत आगामी 2024 च्या निवडणुकीसाठी तपशीलवार सादरीकरणदेखील करण्यात आले तसेच या सूचना आणि कल्पना कशा पद्धतीने पुढे नेता येतील यासाठी एका छोट्या समितीची स्थापन केली जाईल, असे काँग्रेसच ज्येष्ठ नेते केसी वेणुगोपाल यांनी सांगितले.

हेही वाचा: जयश्री जाधवांचा मोठा विजय; कोल्हापुरात भाजपचा करेक्ट कार्यक्रम!

दरम्यान, प्रशांत किशोर यांच्या जवळच्या सूत्रांनी या वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या गुजरात निवडणुकीवर लक्ष केंद्रित असल्याचे म्हटले असून, काँग्रेस नेतृत्व आणि प्रशांत किशोर हे प्रामुख्याने 2024 च्या राष्ट्रीय निवडणुकीसाठी ब्ल्यू प्रिंटवर चर्चा करत असल्याचे म्हटले आहे. 2024 साठी दोन्ही बाजूंनी करार झाल्यानंतर गुजरात किंवा इतर कोणत्याही राज्यातील निवडणुका पीकेच्या नियुक्ती आणि जबाबदारीच्या अनुषंगाने होतील, सूत्रांचे म्हणणे आहे.

Web Title: Prashant Kishor Asked To Join Party Has Drawn Up 2024 Plan Congress

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..