

Prashant Kishor On Samrat Chaudhari
esakal
Patna: बिहारचे मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्याबाबत गोळी मारण्याचा उल्लेख असलेल्या वक्तव्यावरून निर्माण झालेल्या वादात जन सुराज पक्षाचे संस्थापक प्रशांत किशोर यांनी आज स्पष्टीकरण दिले. ‘जे बोललो नाही, ते माझ्या तोंडी घालू नका. जे बोललो आहे, त्यावर ठाम आहे,’ असे सांगत त्यांनी आपल्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला जात असल्याचा दावा केला. दरम्यान, त्यांच्या विधानावरून भाजपने आक्षेप घेत सार्वजनिक माफीची मागणी केली आहे.