Rahul Gandhi : काहीच लॉजिक नाही... प्रशांत किशोर यांचं 'भारत जोडो न्याय यात्रे'च्या टाइमिंगवर प्रश्नचिन्ह

Prashant Kishor On Bharat Jodo Nyay Yatra : काँग्रेसची 'भारत जोडो न्याय यात्रा' सध्या राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली पश्चिम बंगालमधून जात आहे.
Prashant Kishor On Bharat Jodo Nyay Yatra
Prashant Kishor On Bharat Jodo Nyay Yatra

Prashant Kishor On Bharat Jodo Nyay Yatra : काँग्रेसची 'भारत जोडो न्याय यात्रा' सध्या राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली पश्चिम बंगालमधून जात आहे. मणिपूरपासून सुरू झालेला या यात्रेचा प्रवास आसाममार्गे पश्चिम बंगालमध्ये आणि नंतर बिहारमध्ये त्यानंतर आता पुन्हा पश्चिम बंगालमध्ये सुरू आहे.

मोठ्या उत्साहात सुरू असलेल्या या यात्रेबद्दल प्रसिद्ध राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी या यात्रेच्या टाइमिंगबाबात प्रश्न उपस्थित करत यामध्ये कोणतेही लॉजिक नसल्याचे म्हटले आहे.

इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत प्रशांत किशोर म्हणाले की, मला माहित नाही की त्यांना कोण सल्ला देत आहे, परंतु मुख्यालय सोडून यात्रा काढण्यासाठी ही योग्य वेळ असू शकत नाही. निवडणुकीच्या ६ महिने किंवा वर्षभर आधी ही यात्रा काढायला हवी होती, असे ते म्हणाले. राजकीय सहकाऱ्यांना भेटण्याची, संसाधने गोळा करण्याची, उमेदवारांना अंतिम रूप देण्याची आणि रोजच्या रोज समोर येणाऱ्या आव्हानांवर उपाय शोधण्याची वेळ असल्याचेही प्रशांत किशोर म्हणाले.

Prashant Kishor On Bharat Jodo Nyay Yatra
Italy in Debt : मेलोनींच्या इटलीवर 2.8 ट्रिलियन युरोचे कर्ज! सरकार विकणार देशाचा 'कोहिनूर'

याशिवाय इंडियन एक्स्प्रेसशी संवाद साधताना त्यांनी सांगितलं की, राहुल गांधींच्या मणिपूर ते मुंबई या प्रवासाचे कोणतेही लॉजिक सापडत नाही. ते म्हणाले, ज्या वेळी ते राजकारणाच्या केंद्रस्थानी असले पाहिजेत, तेव्हा ते यात्रेत व्यस्त आहेत. प्रदेशांना भेट देणे चांगले आहे परंतु हेडक्वार्टर सोडणे शहाणपणाचे नाही. मला माहित नाही की त्यांना असा सल्ला कोण देत आहे.

Prashant Kishor On Bharat Jodo Nyay Yatra
Loksabha Election 2024: राष्ट्रवादीला पुन्हा वंचितची भीती? सुजात आंबेडकरांचे रोहित पवारांना ४ खोचक प्रश्न

14 जानेवारी रोजी मणिपूरमध्ये सुरू झालेली 'भारत जोडो न्याय यात्रा' 67 दिवसांत 6,713 किमी अंतर कापून 15 राज्यांतील 110 जिल्ह्यांतून 20 मार्च रोजी मुंबईत संपणार आहे. तसेच एप्रिल ते मे दरम्यान लोकसभेच्या निवडणुका होणे अपेक्षित आहे. मात्र, निवडणुकीच्या तारखा अद्याप जाहीर झालेल्या नाहीत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com