Prashant Kishor : नितीश कुमारांचा सर्वनाश होणार; 65 जणांच्या मृत्यूनंतर प्रशांत किशोर बरसले

Prashant Kishor on Nitish Kumar
Prashant Kishor on Nitish Kumaresakal

मुंबईः राजकीय रणनितीाकर प्रशांत किशोर यांनी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर घणाघात केला आहे. नितीश कुमारांच्या एका विधानावरुन बिहारमध्ये वातावरण तापलं आहे.

विषारी दारु पिल्याने बिहारमध्ये 65 जणांचा मृत्यू झाला. या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना नितीश कुमारांचा तोल ढासळला. 'जो पियेगा वो मरेगा' म्हणजे जे लोक बनावट दारु पितात ते मरणारच, या आशयाचं ते विधान होतं.

यानंतर प्रशांत किशोर यांनी नितीश कुमारांवर निशाणा साधला आहे. त्यांचा सर्वनाश निश्चित असल्याचं किशोर म्हणाले. ''नितीश कुमार यांच्याएवढा संवेदनाहीन माणूस मी पाहिला नाही, मला पश्चाताप होतोय की मी २०१४-१५ मध्ये त्यांची मदत केली'' अशा शब्दांमध्ये त्यांनी नितीश कुमारांवर टीकास्र सोडलं. बिहारमध्ये बनावट दारुमुळे 65 जणांचा मृ्त्यू झाला. मृत्यू झालेल्या कुटुंबियांच्या नातेवाईकांना भरपाई मिळणार नसल्याचं मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी स्पष्ट केलं आहे.

प्रशांत किशोर पुढे म्हणाले की, दारुबंदीमुळे बिहारचे २० हजार कोटींचं नुकसान होत आहे. ही दारुबंदी अयशस्वी आहे, कारण हे नुकसान वेगवेगळ्या प्रकारच्या टॅक्समधून वसूल केलं जात असल्याचं ते म्हणाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com