Bihar Politics : ‘असंवेदनशील सरकारमुळे राजकारणात’; प्रशांत किशोर
Prashant Kishor : प्रशांत किशोर यांनी बिहारमधील कोरोना काळातील सरकारची असंवेदनशीलता उजेडात आणली आहे. ते बिहारमध्ये राजकारणात सक्रिय होऊन बदल घडवू इच्छितात.
पाटणा : ‘‘कोरोना महासाथीचे संकट नितीशकुमार यांच्या बिहारमधील सरकारने असंवेदनशीलतेने हाताळले. ते पाहून बिहारमधील राजकारणात सक्रिय होण्याचा निर्णय मी घेतला,’’ असा दावा जनसुराज्य पक्षाचे संस्थापक अन् राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी केला.