बिहार लोकसेवा आयोगाची (BPSC) 70वी प्राथमिक परीक्षा रद्द करण्याच्या मागणीसाठी आमरण उपोषण करत असलेले जन सूरज पार्टीचे संस्थापक प्रशांत किशोर यांना पाटणा पोलिसांनी भल्या पहाटे आंदोलनस्थळावरून जबरदस्तीने ताब्यात घेतले. प्रशांत किशोर यांच्यासोबत पोलिसांनी अमानुष कृत्य केल्याचा आरोप जन सुराज पार्टीने केला आहे. पोलिसांनी प्रशांत किशोरर यांना मारहाण केल्याचा आरोप जन सुराज पार्टीने केला आहे. प्रशांत किशोर यांच्या समर्थकांमध्ये जोरदार बाचाबाची झाली.