
नवी दिल्लीः बिहार विधानसभेची निवडणूक जवळ येत असतानाच नेत्यांच्या पक्ष बदलाचे राजकारण सुरू झाले आहे. भाजपचे जुने आणि ज्येष्ठ नेते तसेच माजी प्रदेश महामंत्री सुधीर कुमार शर्मा यांनी शुक्रवार, 1 ऑगस्ट 2025 रोजी प्रशांत किशोर यांच्या 'जन सुराज' पक्षात प्रवेश केला. त्यांच्यासोबत अनेक जिल्ह्यांमधील डझनभर नेते आणि कार्यकर्तेही पक्षात सामील झाले.