

Nitish Kumar
esakal
Jan Suraaj Founder Challenges: बिहारमधील अत्यंत प्रतिष्ठेच्या बांकीपूर विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण प्रचंड तापले आहे. मतदारसंघात सुमारे चार लाख मतदार असून कायस्थ आणि यादव समाजाची संख्या लक्षणीय आहे. २५ उमेदवार रिंगणात असले तरी मुख्य लढत भाजप आणि जन सुराज यांच्यातच होत असल्याचे चित्र आहे. या मतदारसंघासाठी ३० जुलै रोजी मतदान होणार असून ३ ऑगस्ट रोजी मतमोजणी होणार आहे.