प्रशांत किशोर आता पंजाबच्या मुख्यमंत्र्यांचे मुख्य सल्लागार

prashant kishor
prashant kishor
Updated on

राजकीय रणनितीकार प्रशांत किशोर हे आता पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांचे प्रमुख सल्लागार बनले आहेत. यामुळे पुढील वर्षी पंजाबमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीची रणनिती ते आखणार आहेत. मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी ट्विटरद्वारे याबाबत माहिती दिली. 

'लिव्ह इन'मधील जोडप्यात लैंगिक संबंध प्रस्थापित झाल्यास तो बलात्कार कसा? - सुप्रीम कोर्ट 

अमरिंदर सिंग यांनी सोमवारी एक ट्विट केलं आणि म्हणाले, "प्रशांत किशोर यांची माझे मुख्य सल्लागार म्हणून नियुक्ती झाली आहे. त्यामुळे पंजाबच्या जनतेच्या भल्यासाठी आम्ही एकत्र काम करणार आहोत."  

२०१७मध्ये पंजाबमध्ये बजावली होती महत्वाची भूमिका

प्रशांत किशोर हे सध्या पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीसाठी तृणमूल काँग्रेससाठी प्रचार कार्यक्रम पाहत आहेत. दरम्यान, प्रशांत किशोर यांनी पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांच्यासोबत यापूर्वीही काम केलं आहे. त्यांनी सन २०१७ मध्ये पंजाबच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला मोठा विजय मिळवून देण्यात महत्वाची भूमिका बाजवली होती. पंजाबमध्ये पुढील वर्षी विधानसभा निवडणूक होणार आहे. शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आणि शिरोमणी अकाली दलानं भाजपासोबतची युती तोडल्याने या निवडणुकीची गणितं बदलली आहेत. 

पीडितेशी लग्न करशील का?; लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीला सुप्रीम कोर्टाची विचारणा 

दरम्यान, २०१४च्या सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीत प्रशांत किशोर यांनी भाजपाच्या विजयात महत्वाची भूमिका निभावली होती. मात्र, येत्या काळात पश्चिम बंगालमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत भाजपा दोन आकडी संख्याही गाठू शकणार नाही असं प्रशांत किशोर यांनी म्हटलं होतं.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com