मोदी आश्वासन बिहारमध्ये देतात अन् इंडस्ट्री गुजरातमध्ये सुरू करतात : प्रशांत किशोर

Narendra Modi and Prashant Kishor
Narendra Modi and Prashant Kishor

नवी दिल्ली - बिहारमध्ये आपले राजकीय अस्तित्व निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील असलेले प्रशांत किशोर विरोधी पक्षांच्या नेत्यांवर सातत्याने हल्लाबोल करत आहेत. आता प्रशांत किशोर यांच्या निशाण्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत. पंतप्रधान मोदी बिहारमध्ये आश्वासने देतात, मात्र गुजरातमध्ये कारखाने सुरू करतात, असा टोला त्यांनी लगावला.

Narendra Modi and Prashant Kishor
Hate Speech Case : धर्माच्या नावाखाली आपण कुठे पोहोचलो आहोत; SC ने व्यक्त केली चिंता

बिहारमधील नरकटियागंज येथील एका कार्यक्रमात प्रशांत किशोर यांनी हे वक्तव्य केले आहे. ते म्हणाले, मोदीजींना घराघरातून मते मिळाली, ते पंतप्रधान झाले. त्यानंतर मात्र प्रत्येक घरातील सिलेंडरची किंमतही 500 रुपयांवरून 1300 रुपयांपर्यंत वाढली. 200 रुपयांचे 5 किलो धान्य देऊन मोदीजी तुमच्या खिशातून 500 ऐवजी 1300 रुपये सिलेंडरच्या नावावर काढतात. पुढच्या वेळी जिंकल्यास सिलिंडरची किंमत 2000 पेक्षा जास्त असेल.

Narendra Modi and Prashant Kishor
Bhaskar Jadhav: दुष्परिणामांची चिंता करीत नाही; चिपळूणमध्ये जाधवांचा एल्गार

प्रशांत किशोर यांनी गुजरातचा संदर्भ देत म्हटले की, मोदीजी बिहारमध्ये कारखाने सुरू करण्याचे आश्वासन देतात, पण नंतर ते कारखाने गुजरातमध्ये सुरू केले जातात.

गेल्या काही दिवसांपासून प्रशांत किशोर सर्व विरोधी पक्षांवर अशाच प्रकारे राजकीय हल्लाबोल करत आहेत. कधी नितीशकुमार त्यांच्या निशाण्यावर असतात तर कधी ते तेजस्वी यादव यांच्यावर हल्ला चढवतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com