''सध्या नवा पक्ष नाही पण, बिहारमध्ये काढणार 3,000 किमीची पदयात्रा''

आपल्याला बिहारच्या जनतेसाठी काम करायचे असून, तेथील जनतेला भेटून बोलणार असल्याचे ते म्हणाले.
Prashant Kishor Tweet
Prashant Kishor Tweetesakal

नवी दिल्ली : निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर (Prashant Kishor) यांची काँग्रेससोबत चर्चा फिस्कटल्यानंतर ते नव्या पक्षाची स्थापना करणार असल्याची जोरदार चर्चा रंगली होती. मात्र, या सर्व चर्चांना पूर्णविराम लागला असून, सध्या कोणत्याही नव्या पक्षाची स्थापना करणार नसल्याचे प्रशांत किशोर यांनी स्पष्ट केले आहे. परंतु, येत्या 2 ऑक्टोबरपासून बिहारमध्ये 3000 हजार किलोमीटरची पदयात्रा करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. आपल्याला बिहारच्या जनतेसाठी काम करायचे असून, तेथील जनतेला भेटून त्यांच्याशी बोलणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. (Prashant Kishor Announce Padyatra Across Bihar )

प्रशांत किशोर म्हणाले की, आरोग्यापासून ते रोजगारापर्यंत बिहारची (Bihar) स्थिती अत्यंत वाईट आहे. संपूर्ण देशात बिहार सर्वात खालच्या क्रमांकावर आहे. हे मी नव्हे तर, भारत सरकारचे आकडे सांगत असल्याचे ते म्हणाले. लालू प्रसाद (Lalu Prasad) आणि नितीशकुमार (Nitish Kumar) यांच्या 30 वर्षांच्या शासनानंतरही बिहार हे मागासलेलेच राज्य राहिले असून, बिहारला पुढे न्यायचे असेल तर, सर्वांना पुढे यावे लागेल. त्यासाठी नवा विचार आणि नव्या प्रयत्नांची गरज असल्याचेही प्रशांत किशोर यांनी स्पष्ट केले. (Prashant Kishor News)

Prashant Kishor Tweet
महाराष्ट्रात घातपाताचा कट फसला; हरियाणातून चार दहशतवाद्यांना अटक

प्रशांत पुढे म्हणाले की, माझ्याकडे जे काही आहे ते मी पूर्णपणे बिहारला समर्पित करत असून, मी स्वतः जाऊन बिहारच्या लोकांना भेटणार आहे. तसेच त्यांचा दृष्टिकोन समजून घेणार आहे. राज्याची स्थिती आणि दिशा बदलण्यासाठी नव्या राजकीय पक्षाची गरज असल्याचे त्यांनी मान्य केले आहे. परंतु, त्यांनी त्यासंबंधी कोणतीही घोषणा केलेली नाही.

प्रशांत किशोर यांच्या ट्वीटनंतर वातावरण तापले

काही दिवसांपूर्वी प्रशांत किशोर यांनी 'जन सुराज' की राह पर जाने का समय है. 'शुरुआत बिहार से'." असे ट्वीट करत बिहारमधून आपली नवी रायकीय इनिंग सुरु करण्याचे संकेत दिले आहेत. त्यानंतर येथील राजकीय वातावरण चांगलेच तापले होते. त्यानंतर भाजपचे ज्येष्ठ नेते सुशील कुमार मोदी यांनी एकापाठोपाठ एक ट्विट करत त्यांच्यावर निशाणा साधला होता. यात त्यांनी वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळ्या पक्षांसोबत काम करूनही ज्यांना जनतेचे प्रश्न समजले नाहीत, ते आता एकटेच काय, बाण सोडतील असा टोला लगावला होता. तसेच चार मुख्य प्रवाहातील पक्षांशिवाय बिहारमध्ये कोणत्याही नव्या राजकीय प्रचाराचे भवितव्य नसल्याचेही म्हटले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com