अग्निपथ निर्दशनावरून प्रशांत किशोर यांनी भाजप-जेडीयूवर साधला निशाणा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Prashant Kishor targets BJP-JDU on Agnipath scheme

प्रशांत किशोर म्हणाले, भाजप-जेडीयूच्या भांडणाचा फटका बिहारला बसला

नवी दिल्ली : अग्निपथ योजनेच्या (Agnipath scheme) विरोधात झालेल्या हिंसक निदर्शनांवरून राजकीय हल्ले सुरू आहे. निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर (Prashant Kishor) यांनी रविवारी (ता. १९) भारतीय जनता पक्ष आणि जनता दल युनायटेडवर निशाणा साधला. राज्य जळत आहे आणि दोघेही आरोप-प्रत्यारोप करण्यात व्यस्त असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. विशेष म्हणजे या हिंसाचाराचा सर्वाधिक फटका बिहारला बसला आहे. (Prashant Kishor targets BJP-JDU on Agnipath scheme)

प्रशांत किशोर (Prashant Kishor) यांनी ट्विटद्वारे हिंसाचाराचे समर्थन केले आहे. त्यांनी लिहिले, अग्निपथवर आंदोलन व्हायला हवे, हिंसाचार आणि तोडफोड नाही. जेडीयू (JDU)आणि भाजपमधील (BJP) आपसी भांडणाचा फटका बिहारमधील जनतेला सहन करावा लागत आहे. बिहार जळत आहे आणि दोन्ही पक्षांचे नेते प्रकरण मिटवण्याऐवजी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्यात व्यस्त आहेत.

हेही वाचा: श्रीलंका : पुढील आठवड्यापासून सरकारी कार्यालये, शाळा बंद

अनेक संघटनांनी शनिवारी बिहार बंदची घोषणा केली होती. या काळात राज्यात हिंसाचार झाला होता. पोलिसांनी आतापर्यंत राज्यात ७०० हून अधिक जणांना अटक केल्याचे वृत्त आहे. त्याच वेळी घटनांबाबत १३८ एफआयआर नोंदवण्यात आले आहेत. राज्यातील तारेगणासह अनेक रेल्वे स्थानकांवर आंदोलकांनी गोंधळ घातला. या काळात रेल्वेचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाल्याचे बोलले जात आहे.

Web Title: Prashant Kishor Targets Bjp Jdu On Agnipath Scheme

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :BiharBjpprashant kishore
go to top