Prashant Kishor: पदयात्रेचा खर्च कोण करतं? प्रशांत किशोर यांनी केला मोठा खुलासा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

prashant kishor said never work with congress party because they spoiled his track record

Prashant Kishor: पदयात्रेचा खर्च कोण करतं? प्रशांत किशोर यांनी केला मोठा खुलासा

नवी दिल्ली - राजकीय रणनितीकार प्रशांत किशोर सध्या पदयात्रा काढत आहे. मात्र त्यांच्या पदयात्रेवर सर्वच नेत्यांकडून हल्लाबोल करण्यात येत आहे. पदयात्रेचे पैसे त्यांच्याकडे कुठून येतात, असा प्रश्न त्यांचे विरोधक उपस्थित करीत आहेत. यावर आता प्रशांत किशोर यांनी मोठा खुलासा केला आहे.

हेही वाचा: Sonia Gandhi: 'आज कळलं आजी किती बरोबर होती...; राहुल गांधींची सोनियांसाठी भावनिक पोस्ट

प्रशांत किशोर म्हणाले, गेल्या 10 वर्षात त्यांनी अनेक राजकीय पक्षांना मदत केली. हे पैसे त्यांच्याकडूनच सरस्वतीची देणगी म्हणून येतात.

पीके म्हणाले की, गेल्या 10 वर्षात त्यांनी 11 वेळा निवडणुका लढवल्या. त्यापैकी १० वेळा विजयी झालो. या लोकांकडून त्यांनी कधीच पैसे घेतले नाहीत. पण आता त्यांच्याकडून मदत घेतोय. कारण आज आपल्याला पैशांची गरज आहे. मी आमदार किंवा खासदार नाही तसेच कंत्राटदार किंवा इतर कोणताही व्यवसाय करत नाही.

ते म्हणाले की, आज देशातील सहा असे मुख्यमंत्री आहेत जे आपला आधार घेऊन सत्तेच्या सर्वोच्च स्थानी पोहोचले आहे. सहा मुख्यमंत्र्यांनी थोडीफार मदत केली तरी पुरेसे होतं, असे ते स्पष्टपणे बोलले.

हेही वाचा: पॅरोलवर असलेल्या राम रहीमचा म्युझिक व्हिडीओ लॉन्च; मुख्यमंत्री खट्टर म्हणाले...

प्रशांत किशोर यावेळी राजकीय पक्षांच्या खर्चावर चर्चा केली. ते म्हणाले की, राजकारणी लोक हेलिकॉप्टरच्या वापरावर सर्वाधिक पैसे खर्च करतात. याशिवाय गर्दी जमविण्यासाठी मोठा खर्च होतो. स्टेज तयार करून मैदाने बुक करणे आणि जाहिराती यावर मोठ्या प्रमाणात पैसा उधळण्यात येतो. मात्र आपण यापैकी एकही गोष्ट करत नसल्याचं त्यांनी म्हटलं.