Prashant Kishor : पीके अखेर भाजपसोबतच जाणार...; जेडीयू अध्यक्षांचा मोठा दावा

Prashant Kishor Tweet
Prashant Kishor Tweetesakal

पाटणा : जनता दल युनायटेड (जेडीयू)चे राष्ट्रीय अध्यक्ष लालन सिंह यांनी पुन्हा एकदा प्रशांत किशोर यांच्यावर हल्लाबोल केला आहे. प्रशांत किशोर हे व्यावसायिक आहेत, त्यांचा व्यवसाय आहे. ते व्यवसाय वाढवण्यासाठी मार्केटिंग करतात, असंही त्यांनी नमूद केलं. (Prashant Kishor news in Marathi)

Prashant Kishor Tweet
Mission Cheetah आमचाच कार्यक्रम, जयराम रमेशच गेले होते आफ्रिकेला; काँग्रेसचा दावा

लालन सिंह म्हणाले की, सीएम नितीश कुमार यांनी त्यांना ऑफर दिल्याची चर्चाही मार्केटिंगचाच एक भाग आहे. त्यांना कोणतीही ऑफर देण्यात आली नाही. प्रशांत किशोर यांनीच इच्छा व्यक्त केली होती. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी त्यांना आधी राष्ट्रीय अध्यक्षांना भेटण्यास सांगितले. त्यानंतर ते दिल्लीत आम्हाला भेटले. त्या भेटीत मी त्यांना सांगितले की, तुम्हाला पक्षाच्या शिस्तीत काम करावे लागेल. पक्षाच्या निर्णयाचे पालन करावे लागेल. जर तुम्ही या दोन अटी मान्य करत असाल तर तुम्ही पक्षांतर्गत काम करू शकता.

त्यावर प्रशांत किशोर यांनी मुख्यमंत्र्यांची पुन्हा भेट घेण्याची इच्छा व्यक्त केली. मात्र मी दिल्लीहून पाटण्याला येण्यापूर्वी त्यांनी मीडियाशी संवाद साधला आणि असे सांगितले की, आम्हाला बोलावले जाईल, पण आम्ही जाणार नाही.

Prashant Kishor Tweet
हट्ट पुरवल्यानेच सुप्रिया राजकारणात, अन्यथा...; शरद पवारांनी उकललं गुपित

ललन सिंह म्हणाले की, प्रशांत किशोर आज ऑफर दिल्याबद्दल जे बोलत आहेत ते चुकीचे आहे. त्यांना कोणीही ऑफर दिलेली नाही. ऑफर देण्यासाठी ते आहे तरी कोण? त्यांना बिहारमध्ये फिरायचे असेल तर ते फिरतात. त्यांना कोणी अडवत आहे का? आजकाल प्रशांत किशोर हे भाजपसाठी काम करत आहेत हे आपणा सर्वांना माहीत आहे. आज भाजप आपल्या पक्ष जनआधारावर विकास करण्याचा प्रयत्न करत नाही, तर केवळ षडयंत्राच्या जोरावर पक्षाचा विकास करण्याचा प्रयत्न करतोय, अशी टीकाही लालन सिंह यांनी केली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com