रावणाची लंका जळाली, तुम्ही तर किरकोळ विषय; ‘बारामती’वरून पडळकरांचा पवारांवर हल्लाबोल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Gopichand Padalkar Shared Pawar, Supriya Sule

रावणाची लंका जळाली, तुम्ही तर किरकोळ विषय; ‘बारामती’वरून पडळकरांची पवारांवर टीका

मुंबई – एकीकडे विरोधकांचे ऐक्य करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, तर दुसरीकडे भारतीय जनता पक्षाने २०२४ च्या लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. त्यातही जे मतदार संघ आजपर्यंत भाजपला जिंकता आले नाहीत, त्या ठिकाणी भाजपने अधिक लक्ष देण्याचे नियोजन केले आहे. अशा मतदार संघांमध्ये आता बारामती आहे. बारामती मतदार संघाचं नेतृत्व शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे करातत. याच बारामतीचा पाडाव करण्यासाठी भाजपने दंड थोपटले आहेत. त्यातच आमदार गोपीचंद पडळकर यांनी पवार कुटुंबीयांवर हल्लाबोल केला आहे. (Sharad Pawar News in Marathi)

हेही वाचा: ग्रामपंचायतींचा धुराळा 13 ऑक्टोबरला उडणार; थेट जनतेतून निवडला जाणार सरपंच

बारामती जिंकण्यासाठी भाजपने व्युहरचना केली आहे. मध्यंतरी अर्थमंत्री निर्मला सीतारामन देखील बारामतीत येणार आहेत. त्यांचा हा दौरा भाजपचं संघटन वाढविण्याच्या पार्श्वभूमीवर महत्त्वपूर्ण मानला जात आहे. आज पुन्हा एकदा बारामतीचा मुद्दा चर्चेत आला असून जयंत पाटील यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. त्याला भाजपकडून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आमदार गोपीचंद पडळकर यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

बारामतीचा पाडाव करण्यासाठी अनेकजण आले आहेत. मात्र त्यांना कोणालाही जमलं नाही. एकवेळा सूर्य पश्चिमेला उगवेल, पण शरद पवारांना बारामती कधी सोडणार नाही, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी म्हटलं.

हेही वाचा: Parth Pawar मुख्यमंत्र्यांच्या घरी; श्रीकांत शिंदेंच्या उपस्थितीत घेतलं बाप्पाचं दर्शन

त्यावर फडणवीस म्हणाले की, इतिहासात इंदिरा गांधी त्याकाळी भारतात सर्वात लोकप्रिय नेत्या होत्या. मात्र त्यांनाही पराभव स्वीकारावा लागला होता. त्यामुळे कोणाही या गर्वाने राहू नये की, आम्ही पराभूत होऊ शकत नाही. आमचा विरोध व्यक्तीला नाही. आमचं मिशन महाराष्ट्र असून आम्हाला जागा जिंकायच्या असल्याचं फडणवीस म्हणाले.

दरम्यान गोपीचंद पडळकर म्हणाले की, राष्ट्रवादीने अविर्भावात राहू नये. रावणाची लंका जळाली होती. तुम्ही तर किरकोळ विषय आहात. माझं बारामतीत डिपॉजीट जप्त झालं हे खरं असलं तरी तिथं कायम तिच परिस्थिती राहिल असं नाही, असा टोलाही पडळकर यांनी लगावला.

Web Title: Sharad Pawar Baramati Gopichand Padalkar Devendra Fadnavis Supriya Sule

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..