

Viral Video
esakal
देश: प्रयागराजमधील फाफामऊ येथे सोमवारी दुपारी झालेल्या भीषण कोल्ड स्टोरेज दुर्घटनेने संपूर्ण जिल्हा हादरला आहे. या घटनेत आतापर्यंत ४ मजुरांचा मृत्यू झाला असून अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या घटनेची गंभीर दखल घेत मृतांच्या नातेवाईकांना आर्थिक मदतीची घोषणा केली आहे.
सोमवारी (२३ मार्च २०२६) दुपारी दीड ते दोनच्या सुमारास चंदापूर गावातील या कोल्ड स्टोरेजमध्ये अमोनिया गॅसच्या टाकीचा जोरदार स्फोट झाला आणि बघता बघता संपूर्ण इमारत पत्त्यांसारखी कोसळली.