

Prayagraj
sakal
प्रयागराजमध्ये सुरू असलेल्या रिंग रोड प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यातील सिक्स लेन पुलाच्या कामाला गंगा नदीच्या बदलत्या प्रवाहामुळे अडथळा निर्माण झाला आहे. संगम परिसरात गंगेच्या दोन स्वतंत्र धारा तयार झाल्याने पुलाच्या खांबांच्या पायाभरणीचे काम रखडले असून, हा अडथळा दूर करण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने पीपा पूल उभारण्याचा निर्णय घेतला आहे.